Join us  

रणवीर सिंगच्या ‘83’चा टीझर आला...! ‘तो’ ऐतिहासिक क्षण पाहून भावुक व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:20 PM

83 Teaser Released :  लॉर्ड्स मैदानात भारतीय संघाने रचलेला इतिहास पुन्हा नव्याने जगण्याची संधी... ‘83’चा टीझर पाहून आठवणी ताज्या होतील...

रणवीर  सिंगचा (Ranvir Singh) ‘83’ हा सिनेमा येणार येणार म्हणत असताना अखेर प्रतीक्षा संपली. होय, येत्या 24 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी या चित्रपटाचा टीझर रिलीज (Teaser Released) झालाय. साहजिकच, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘83’चा टीझर पाहून 1983 च्या क्रिकेटप्रेमींच्या आठवणी ताज्या होतील. याचवर्षी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हीच विजयगाथा सांगणा-या  ‘83’ या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.

59 सेकंदाच्या या टीझरमध्ये लॉर्ड्स मैदानावरील भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामना दाखवण्यात आला आहे. मैदानावर बेभान होऊन सामना पाहणारे प्रेक्षक आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारा लॉर्ड्सवरचा थरार असा हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘83’ हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत आहे.  ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, अदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका आहेत.  दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमीची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाचा लूकदेखील व्हायरल झाला होता. दीपिका यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसून आली आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट, फँटम फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत  ‘83’ हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत   रिलीज होणार आहे.  

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंग