Join us  

आई समजावून थकली, आता रणवीर सिंगही थकला! दीपिकाच्या सवयीला सगळेच वैतागले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:33 PM

 फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच केली दीपिकाची तक्रार...

ठळक मुद्देदीपिका सांगते, मला सतत काही ना काही करत राहण्याची सवय आहे. मी एका जागी जास्त वेळ बसू शकत नाही.

दीपवीर अर्थात दीपिका पादुकोणरणवीर सिंग हे चाहत्यांचे बॉलिवूडचे सगळ्यात लाडके कपल. लॉकडाऊनच्या काळात दीपवीरचे दर्शन दुर्मिळ झालेय. पण हो, सोशल मीडियावर मात्र हे कपल चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या दीपिका व रणवीर दोघेही लॉकडाऊनमुळे घरी आहेत आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करण्यात बिझी आहेत. एकंदर काय तर  दोघंही मॅरिड लाइफचा आनंद घेताना दिसत आहेत. पण आता एक वेगळीच बातमी समोर येतेय. होय, रणवीर म्हणे दीपिकाच्या एका सवयीला इतका वैतागलाय की, त्याने थेट  फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच दीपिकाची तक्रार केली आहे. आता दीपिकाने असे काय केले की, रणवीरला आपल्या लाडक्या बायकोची तक्रार करावी लागली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पुढे वाचा.

होय, नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने स्वत:च याबद्दल खुलासा केला केला आहे. तिने सांगितले, माझ्या सतत काही ना काही करत राहण्याच्या सवयीचा रणवीरला खूप वैताग आला आहे आणि त्याने माझी तक्रार फॅमिली ग्रुपमध्येही करुन टाकली आहे. घरी मेड येत नसल्याने घरातले सर्व काम सध्या स्वत:च करावे लागतेय. अशात साफ-सफाई करत असताना एक दिवस माझी पाठ दुखायला लागली. पण अशाही स्थितीत मी आराम न करता कामे उरकायला घेतली. मग काय, यामुळे रणवीर कमालीचा संतापला आणि त्याने माझी तक्रार केली.

‘ तू आता आराम कर आणि या जागेवरुन अजिबात हलू नकोस, असे म्हणून रणवीर व्यायाम करायला निघून गेला. 20 मिनिटांनी   तो परत आला तेव्हा मी पुन्हा स्वच्छता करत होते. हे पाहून तो इतका संतापला की, त्याने मला चांगलेच सुनावले. तू एका जागी शांत बसू शकत नाही का? असे काय काय त्याने मला सुनावले. इतकेच नाही तर माझ्या आईकडेही तक्रार केली.

आईसुद्धा वैतागलीदीपिका सांगते, मला सतत काही ना काही करत राहण्याची सवय आहे. मी एका जागी जास्त वेळ बसू शकत नाही. माझ्या आईने अनेकदा मला समजावले. पण आता ती सुद्धा मला सांगून थकली आहे. पण माझी सवय सुटत नाही. मी नेहमीच काही ना काही करत राहते.  माझ्याकडे करण्यासाठी काही नसते, अशी वेळच येत नाही.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंग