Join us  

'गली बॉय'मधला रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा फर्स्च लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 10:01 AM

चित्रपट गली बॉयमधला रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. फोटोमध्ये आलिया आणि रणवीर गंभीर ...

चित्रपट गली बॉयमधला रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. फोटोमध्ये आलिया आणि रणवीर गंभीर चेहरा करून बसले आहेत. आलियाच्या चेहऱ्यावर जखमीचे वण्र दिसतायेत. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी हा फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  या फोटो सोबतच त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा सांगितली आहे, 14 फेब्रुवारी 2018 ला गली बॉय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.    याआधी सेटवरचे काही रणवीर आणि आलियाचे शूटिंग दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. मात्र पहिल्यांदा अधिकृतपणे सोशल मीडियावर फोटो टाकण्यात आले आहे. या चित्रपटासाठी रणवीर आपला लूकपणे बदलला आहे. पद्मावतनंतर तो पुन्हा एकदा आपल्या  मुळ रुपात आला आहे.  हा चित्रपट मुंबईतल्या रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची कथा आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.  रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत.‘पद्मावत’मध्ये अलाऊद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका साकारणारा हाच तो रणवीर,यावर त्याचे हे फोटो पाहिल्यानंतर क्षणभर विश्वास बसत नाही. या फोटोंमध्ये आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसतेय. तिलाही या गेटअपमध्ये ओळखणे कठीण आहे.रणवीर म्हणाला गली ब्वॉय ची गोष्ट खूपच खास आहे. या चित्रपटात तो जोया अख्तर बरोबर काम करतो आहे. रणवीर म्हणाला जोया आणि माझे नातं खूप जवळचं आहे. आम्ही एकमेकांशी खूप मोकळेपणे संवाद साधतो.    आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाचे शूटिंग ही करते आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. यात  एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत. ब्रह्मास्त्र'  रणबीर आणि आलियासोबत बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत.  या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.