Join us

रणवीर- दीपिकाचा व्हॅलेन्टाइन डे टोरंटोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:50 IST

दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगसाठी टोरंटोत आहे.  तर दीपिकाचा प्रियकर रणवीर सिंग मुंबईत तिच्या सिनेमाच्या ...

दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगसाठी टोरंटोत आहे.  तर दीपिकाचा प्रियकर रणवीर सिंग मुंबईत तिच्या सिनेमाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. रणवीरला दीपिकासोबत व्हॅलेन्टाइन डे साजरा करायचा आहे, म्हणूनच तो दीपिकाला भेटण्यासाठी टोरंटोला गेला आहे. काळा गॉगल घातलेला त्याचे छायाचित्र तेथील एका मनोरंजन ब्लॉगवर प्रसिद्ध झाले आहे.  रणवीरही त्याच्या चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तरीसुद्धा त्याने व्हॅलेंटाइन डे दीपिकासोबत घालविण्यासाठी फारआधीपासून नियोजन केले होते, असेच त्याच्या या बातमीवरून दिसते. दीपिकाला भेटण्यासाठी रणवीर बुधवारीच भारतातून रवाना झाला. टोरंटोहून परतल्यावर लगेच तो पुन्हा चित्रिकरणात व्यस्त होईल.