Join us  

रानू मंडलवर आली आहे उपासमारीची वेळ, एका वेळेच्या जेवणासाठी देखील राहावे लागतंय दुसऱ्यांवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 3:04 PM

रानू मंडलला सध्या दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. अनेकवेळा रात्री उपाशीच झोपण्याची तिच्यावर वेळ येत आहे.

ठळक मुद्देएका वेळाचे जेवण मिळाले तरीही केवळ भात खावून तिला राहावे लागत आहे आणि त्यातही कमाईचे काहीही साधन नसल्याने एकावेळेच्या जेवणासाठी देखील तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजूबाजूच्या लोकांनी काही खायला दिले, तरच तिच्या जेवणाची सोय होत आहे.

रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जसा व्हायरल झाला तसे तिचे आयुष्य बदलले. पण हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. काही दिवसांतच रानूवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली. आता तर तिला दोन वेळेचे जेवण मिळणे देखील अशक्य झाले आहे. 

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. अशीच काहीशी परिस्थिती रानू मंडलवर आली आहे. रानू मंडलला सध्या दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. अनेकवेळा रात्री उपाशीच झोपण्याची तिच्यावर वेळ येत आहे. एका वेळाचे जेवण मिळाले तरीही केवळ भात खावून तिला राहावे लागत आहे आणि त्यातही कमाईचे काहीही साधन नसल्याने एकावेळेच्या जेवणासाठी देखील तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजूबाजूच्या लोकांनी काही खायला दिले, तरच तिच्या जेवणाची सोय होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटात गाणं गायची संधी देखील मिळाली. पण वाट्याला आलेलं हे स्टारडम रानूला टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जुने दिवस परत आले आहेत असे म्हटले जाते.

टॅग्स :राणू मंडल