Join us  

भन्साळींचा 'ब्लॅक' 19 वर्षांनंतर ओटीटीवर रिलीज, चाहत्यांचं प्रेम पाहून भारावली राणी मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 1:47 PM

राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा मास्टरपीस 'ब्लॅक' (Black) सिनेमाला ओटीटीवर रिलीज झााल आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीने दमदार अभिनय करत प्रेक्षकांना चकित केले होते. आजही सिनेमाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येतात. 'ब्लॅक' ला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला  जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत.

राणी म्हणाली, “ब्लॅकला 19 वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझे सर्वकाळचे आवडते चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील.”

ती पुढे म्हणाली “मला आनंद आहे की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांनी 19 वर्षांपूर्वी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास चुकले होते ते सर्व त्यांच्या स्क्रीनवर पाहून  त्याचे साक्षीदार होऊ शकतील. तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे पाहणे नेहमीच सुखद असते.”

टॅग्स :राणी मुखर्जीसंजय लीला भन्साळीअमिताभ बच्चनसिनेमा