Join us

रणदीप-काजल यांची प्रतिज्ञा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 15:16 IST

 वेल, वाचून थोडंसं वेगळं वाटलं ना... रणदीप हुडा आणि काजल अग्रवाल कसली प्रतिज्ञा घेत आहेत ? त्या दोघांना म्हणे ...

 वेल, वाचून थोडंसं वेगळं वाटलं ना... रणदीप हुडा आणि काजल अग्रवाल कसली प्रतिज्ञा घेत आहेत ? त्या दोघांना म्हणे डोळ्यांचे दान करावयाचे आहे. ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे.त्यात काजलने अंध मुलीची भूमिका साकारली आहे. ती या भूमिकेत एवढी रममाण झाली की, तिला अंध व्यक्तींच्या भावना कळू लागल्या आहेत. म्हणून त्या दोघांनीही आता ठरवले आहे की, ते त्यांचे डोळे कॉर्निअल ब्लार्इंडनेसने ग्रस्त रूग्णांना दान करतील.वेल, रणदीप-काजल तुमची प्रतिज्ञा खरंच खुप चांगली आहे. तुम्हाला पाहून अनेकांनीही समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे यायला हवे.