Join us

​रणदीप हुड्डा शोधतोय ‘असली’ हीरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 11:54 IST

मोठ्या पडद्यावर अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवणारे अनेक महानायक आपण पाहिले असतील; मात्र ‘रील लाईफ’ आणि ‘रिअल लाईफ’ हीरोंमध्ये ...

मोठ्या पडद्यावर अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवणारे अनेक महानायक आपण पाहिले असतील; मात्र ‘रील लाईफ’ आणि ‘रिअल लाईफ’ हीरोंमध्ये खूप फरक असतो. अशाच खऱ्याखुऱ्या आयुष्यातील महानायकांना शोधण्याची मोहिम रणदीप हुड्डाने हाती घेतली आहे.रिअल लाईफमध्ये सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन स्वत:चा यशोमार्ग आखणाऱ्या अशा जिगरबाज लोकांविषयी त्याने सोशल मीडियावर आपले विचार शेअर करून चाहत्यांना असे लोक शोधण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. स्वार्थ सोडून इतरांना मोठ्या मनाने मदत करणाºया चांगल्या लोकांचा सन्मान झालाच पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.रणदीप नेहमीच सामाजात घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींना मदत करताना दिसतो.  प्राण्यांविषयीचे त्याचे प्रेम तर सर्वश्रुतच आहे. काही महिन्यांपूर्वी एका हिलस्टेशनवर जखमी झालेल्या घोड्यांना त्याने स्वत: मदत केली होती.तो सांगतो, ‘आजच्या काळात सर्व जण ‘मी, माझे’ म्हणण्यात आणि मानण्यात समाधानी असतो. इतरांसाठी खुल्या मनाने काम करण्याची वृत्ती फार कमी लोकांमध्ये दिसते. अशा काही अपवादात्मक लोकांचे आदर्श उदाहरण समोर आणण्यासाठी मी रिअल लाईफ हीरो शोधत आहे.’