Join us

अशी सुरु झाली अभिनेता रणदीप हुड्डा आणि लीनची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने सांगितलं पहिल्या भेटीचं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:02 IST

रणदीप आणि लीनची पहिली भेट कुठे आणि कशी झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे.

 बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डा (Randeep hooda) आज त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड लीन लैशराम (in laishram)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोमवारीच रणदीप होणाऱ्या पत्नीसोबत इम्फाळला पोहोचला आहे. याठिकाणी पोहोचल्यावर दोघांनी इम्फाळमधील हिनगांग येथील मंदिरात प्रार्थना केली. २९ नोव्हेंबरला दुपारपासून सुरू होणारे लग्नाचे विधी रात्रीपर्यंत चालणार आहेत. मणिपूरच्या परंपरेनुसार हे कपल मणिपुरी पोशाख घालून लग्न करणार आहेत. काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत अभिनेता सात फेरे घेणार आहे. 

रणदीप आणि लीनची पहिली भेट कुठे आणि कशी झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. अभिनेत्री लीन लैशरामने याबाबतचा खुलासा नुकताच केला आहे. लिन म्हणाली, आम्ही पहिल्यांदा नसीरुद्दीन शाह यांच्या मोटली नावाच्या थिएटर ग्रुपमध्ये भेटलो. तो माझा सिनिअर होता. तिथंच आमची पहिली भेट झाली होती. आम्ही चांगले मित्र होता आणि आता नव्या प्रवासाला सुरुवात करतोय. 

रणदीप आणि लीन 2016 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लीन ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.रणदीपपेक्षा ती 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डा 47 वर्षांचा आहे, तर लिन लैशराम 37 वर्षांची आहे.

लीन मूळची मणिपूरमधील इंफाळ येथील असून ती प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या सिनेमात झळकली आहे. तसंच तिने 'रंगून', 'उमरिका' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखच्या ओम शांती ओम या सिनेमातही तिने स्क्रीन शेअर केली आहे. अलिकडेच ती करिना कपूरच्या 'जाने जान' या सिनेमात झळकली. लीन धनुर्विद्येत कुशल असून ती धनुर्विद्येमध्ये ज्युनिअर नॅशनल चॅम्पिअन ठरली आहे. इतकंच नाही तर बिझनेस वूमन आहे. तिचा स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. 

टॅग्स :रणदीप हुडा