फोटोमध्ये रणबीर, अयान आणि आलिया एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. ‘अयान मुखर्जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा’ असे या फोटोसोबत ट्विट जोडण्यात आले आहे.‘वेक अप सिड’ आणि ‘ये जवानी है दिवानी’नंतर रणबीर-अयान ही अभिनेता-दिग्दर्शक जोडी ‘ड्रॅगन’ तिसऱ्यांदा एकत्र येणार आहे. सुत्रांनुसार ‘ड्रॅगन’ ही तीन चित्रपटांची सिरीज असणार आहे.रणबीरला सुपरहीरो बनवण्यासाठी इस्रायलचा जगप्रसिद्ध मार्शल आर्ट ट्रेनर आयडो पोर्टलची मदत घेण्यात येणार आहे. त्याला भेटल्यावर पोर्टलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून लिहिले होते की, ‘जेव्हा पॅशनेट लोक एकत्र येऊन कल्पनाविश्वाला वास्तवाचे रुप देतात तेव्हा खात्रीने अद्भुत गोष्टी बघायला मिळतात.’Wishing good luck to #AyanMukerji & the team for his next! @karanjohar#RanbirKapoor@aliaa08pic.twitter.com/yQOISDtrVv— Dharma Productions (@DharmaMovies) December 1, 2016
रणबीरच्या ‘ड्रॅगन’ची पहिली अधिकृत घोषणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 13:11 IST
रणबीर कपूरला बऱ्याच काळानंतर ‘ए दिल है मुश्किल’मुळे यशाची चव चाखायला मिळाली. त्यामुळे आनंदात असलेल्या ‘आरके’ने पुढच्या सिनेमासाठी कामासुद्धा ...
रणबीरच्या ‘ड्रॅगन’ची पहिली अधिकृत घोषणा?
रणबीर कपूरला बऱ्याच काळानंतर ‘ए दिल है मुश्किल’मुळे यशाची चव चाखायला मिळाली. त्यामुळे आनंदात असलेल्या ‘आरके’ने पुढच्या सिनेमासाठी कामासुद्धा सुरू केले आहे.बेस्ट फ्रेंड अयान मुखर्जीसोबत तो एका सुपरहीरो चित्रपटात काम करणार ही बातमी तर एव्हाना तुम्हाला माहितच असेल. ‘ड्रॅगन’ असे त्याचे तात्पुरते नामकरण करण्यात आले आहे.पण आज सकाळी या चित्रपटाची निर्मिती सुरू झाल्याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी एका ट्विटद्वारे केली. प्रथमच आलिया भट्ट रणबीरसोबत या चित्रपटाच्या निमित्ताने काम करत आहे. या तिघांचा फोटो शेअर करत धर्मा प्रोडक्शनने एका प्रकारे चित्रपटावर काम सुरू झाल्याची माहितीच दिली आहे. हॉलीवूड चित्रपटांच्या तोडीस तोड व्हीएफएक्स इफेक्टस् या चित्रपटात राहणार आहेत. त्यासाठी हॉलीवूडमधील सर्वात मोठी व्हीएफएक्स कंपनीशी करार करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवताना कोणतीच कमी ठेवायची नाही असे फिल्ममेकर्सने ठरवलेले आहे.