Join us

‘बेफिक्रे’ रणवीर सिंगची बेधडक कबुली! ‘फर्स्ट किस’साठी बुडवला होता टेबल टेनिसचा क्लास !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 10:36 IST

रणवीर सिंग म्हणजे एकदम ‘बेफिक्रे’ व्यक्तिमत्त्व. कुठलाही आडपडदा नाही की कुठलाही आव नाही. रणवीर कायम आहे तसा वावरतो. जगाची ...

रणवीर सिंग म्हणजे एकदम ‘बेफिक्रे’ व्यक्तिमत्त्व. कुठलाही आडपडदा नाही की कुठलाही आव नाही. रणवीर कायम आहे तसा वावरतो. जगाची पर्वा न करता, स्वत:त जगतो. त्याचा हा ‘बेफिक्रे’ स्वभावचं सगळ्यांना आवडून जातो. म्हणूनच रणवीर सिंग अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. अलीकडे रणवीरने ‘फिल्मफेअर’ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अशीच एक बेधडक कबुली दिली. ही कबुली कशाबद्दल तर आपल्या फर्स्ट किसबद्दल. होय, पहिल्या चुंबनाबद्दल. या पहिल्या चुंबनासाठी रणवीरने बरेच कारनामे केलेत. होय, अगदी आपल्या टेबल टेनिसच्या क्लासला चाट मारण्यापर्यंतचे कारनामे केलेत. ‘ सातवीत असताना मी माझा फर्स्ट किस घेतला. फर्स्ट प्रॉपर किस. तो एक आगळा-वेगळा अनुभव होता. माझी ती गर्लफ्रेन्ड माझ्यापेक्षा एका वर्षांनी मोठी होती आणि वेगळ्या शाळेतील होती. तिचे गाल चांगलेच हॉट होते.तिला भेटायला मी नेहमीच टेबल टेनिसचे क्लास बुडवायचो. मला आठवतं, त्यादिवशीही टेबल टेनिसचा क्लास बुडवून मी तिला भेटायला गेलो होतो. त्या बदल्यात मला एक गोड किस मिळाला होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉर्इंट होता. कारण त्यादिवसापर्यंत मी मन लावून टेबल टेनिस खेळत होता. पुढेही असाच मन लावून खेळलो असतो तर त्यावेळी चँम्पियनही बनलो असतो,’ असे रणवीरने यावेळी सांगितले. केवळ पहिले चुंबनच नाही तर याआधी अशाच एका मुलाखतीत रणवीर त्याच्या व्हर्जिनिटीवरही बोलला होता. मी वयाच्या १२ व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली, असे रणवीरने सांगितले होते. अर्थात ते  प्रेम नव्हते तर केवळ सेक्स या विषयाबद्दल असलेली  उत्सुकता होती. त्यावेळी सगळा क्लास माझ्याभोवती जमावयचा आणि माझे अनुभव ऐकायचा, असेही रणवीरने सांगितले होते.ALSO READ: केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!सध्या रणवीर ‘पद्मावती’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणवीर अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात रणवीर सिंग निगेटीव्ह शेड्समध्ये दिसणार असला तरी त्याचे हे लूक लोकांना मनापासून भावले आहे. व्यक्तिरेखेनुसार, रणवीर यात काहीसा भयावह दिसतोय. केवळ दाढीचं नाही तर त्याचे केसही वाढलेले आहेत. चेह-यावर मोठ्या जखमेचा एक व्रण आहे. अर्थात तरिही रणवीरचे हे लूक प्रचंड प्रभावित करणारे आहे.