Join us

रणबीर-कॅटमुळे कोण वैतागलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 13:08 IST

'जग्गा जासूस' सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बासू सध्या भलतेच वैतागलेत. त्यांच्या या वैतागाला कारणीभूत ठरलेत ते बॉलीवुडचे एक्स लव्ह बर्ड्स ...

'जग्गा जासूस' सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बासू सध्या भलतेच वैतागलेत. त्यांच्या या वैतागाला कारणीभूत ठरलेत ते बॉलीवुडचे एक्स लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ. या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचा परिणाम त्यांच्या कामावर जाणवू लागलाय. त्यामुळं जग्गा जासूस सिनेमाचं शेड्युलही अनेकदा बदलावं लागलंय. त्यामुळं सिनेमा लांबत चालला असल्यानं त्याचं बजेटही वाढतंय. नुकतंच मोरक्कोमध्ये या सिनेमाचं शुटिंग पार पडलं. यावेळी सुद्धा रणबीर आणि कॅटच्या ब्रेकअपमुळं अनेकदा सीन घेताना अनुरागची दमछाक झाली. या सिनेमाचं उर्वरित शुटिंगसुद्धा मोरक्कोमध्येच होणार होतं. मात्र आता अनुरागनं हा प्लान बदललाय. अनुरागनं मोरक्कोला जाण्याऐवजी आता मुंबईमध्येच मोरोक्कोचा सेट उभारायचं ठरवलंय. त्यामुळं बजेट वाचवण्याचा अनुरागचा हा फंडा चांगलाच म्हणावा लागेल.