रणबीर- कॅट करणार हॅट्ट्रिक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:01 IST
आपल्याला तर माहीतच आहे की, कॅट आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर हे दोघेही ताकदीचे कलाकार आहेत. राजकुमार संतोषीच्या 'अजब ...
रणबीर- कॅट करणार हॅट्ट्रिक ?
आपल्याला तर माहीतच आहे की, कॅट आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर हे दोघेही ताकदीचे कलाकार आहेत. राजकुमार संतोषीच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' मध्येच या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. त्यानंतर प्रकाश झा यांच्या 'राजनीती' मध्येही या जोडीच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. आता वास्तव जीवनातही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रणबीर-कॅट जोडीच्या 'जग्गा जासूस' ची चाहते सध्या वाट पाहात आहेत. 'बी' टाऊन मधल्या सिनेपंडीतांच्या मते, तर ही जोडी यशाची हॅटट्रीक करणार आहे.