Join us

रणबीर-कॅटची ‘फन कॅब’ राईड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 00:19 IST

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघे पुन्हा एकदा त्यांच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी एकत्र आल्याचे कळाले आहे. त्यांचा ब्रेक-अप ...

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघे पुन्हा एकदा त्यांच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी एकत्र आल्याचे कळाले आहे. त्यांचा ब्रेक-अप झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली. त्यानंतर कॅटनेही बार बार देखोची शूटींग सुरू केली होती. जग्गा जासूसची टीम चित्रपटाच्या शूटींगसाठी फार उत्सुक होती. पण कॅट-रणबीर जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ते काही शक्य नव्हते.source : indiglamourसोशल मीडियावर त्यांचा एक ‘फन कॅब’ राईडचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते दोघे एकमेकांकडे पाहत देखील नाहीयेत. कुठलीच केमिस्ट्री त्यांच्यात दिसत नाहीये. पण, त्यांच्या नात्यात एक अवघडलेपण आहेच. कदाचित ते त्यांच्या भूमिकेची गरज असेल किंवा त्यांच्या खºया आयुष्यातील वास्तव. ते दोघे सध्या केप टाऊन येथे शूटिंग करत आहेत.