Join us  

...तर 'गली बॉय'मध्ये आलिया भटसोबत दिसला असता रणबीर कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 8:39 PM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'गली बॉय'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रणवीर सिंगने या चित्रपटात नावेद शेख नामक रॅपरची भूमिका केली आहे. ही भूमिका करण्याची इच्छा रणबीर कपूरने दिग्दर्शिका झोया अख्तरकडे व्यक्त केली होती. मात्र झोयाने त्याला या चित्रपटातील दुसरी भूमिका दिली होती. मात्र रणबीरने या चित्रपटातून माघार घेतली. 

अडीच वर्षांपूर्वी झोया अख्तर मुख्य कलाकाराच्या शोधात होती. चित्रपटाची कथा रणबीर कपूरला खूपच भावली होती. त्याने या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुख्य भूमिकेसाठी रणबीरऐवजी रणवीर साजेसा ठरेल असे झोयाला वाटत होते. त्यामुळे रणबीरला तितक्याच ताकदीची पण दुसरी भूमिका झोयाने दिली होती. मात्र नंतर रणबीरने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.  

तर हा चित्रपट माझा आहे आणि या चित्रपटात माझ्याव्यतिरिक्त दुसऱ्या अभिनेत्याची जर निवड झाली असती तर मला ते सहनच झाले नसते, अशी भावना ट्रेलर लाँचिगच्या वेळी रणवीरने व्यक्त केली.

‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटासाठी रणवीर रॅपचे प्रशिक्षण घेतले आहे.

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगरणबीर कपूरआलिया भट