कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला अखेर माफी मागावी लागली. कशाबद्दल, हे तुमच्या लक्षात आले असेलच. कालचं आम्ही याबद्दलची बातमी दिली होती. होय, Kokichi Mikimoto या नावाजलेल्या ज्वेलरी ब्रँडचे डिझाईन चोरल्याचा आरोप रिद्धिमावर करण्यात आला होता. यामुळे रिद्धिमा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. हे ‘चोरी’ प्रकरण इतके अंगलट येईल, अशी कल्पनाही रिद्धिमाने केली नव्हती. पण ते आले आणि मग काय, कपूर घराण्याच्या या लेकीला जाहीर माफी मागावी लागली.
‘डियर इन्स्टा फॅमिली, रिद्धिमा ज्वेलरी कुठल्याही प्रकारच्या चोरीचे समर्थन करत नाही. आम्ही माफी मागतो की, आम्ही अलीकडे शेअर केलेल्या पर्ल ज्वेलरीमध्ये ओरिजनल क्रेडिट दिले नाही. आम्ही नेहमीच सृजनशीलतेचा सन्मान केला आहे,’ असे लिहित रिद्धिमाने या सगळ्या प्रकरणावर माफी मागितली आहे. रिद्धिमाचे R नामक ज्वेलरी कलेक्शन आहे. तिचे डिझाईन सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये लोकप्रीय आहेत.तिच्या या माफीनंतर हे प्रकरण इथेच थांबेल अशी आशा करूयात आणि रिद्धिमाला शुभेच्छा देऊ यात.असे आहे प्रकरण...