डिप्पीला रणवीर म्हणतो, ‘बूब्बू’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:53 IST
गेल्या काही वर्षांपासून ‘बेफिक्रे’ फेम रणवीर सिंग आणि ‘पद्मावती’ फेम दीपिका पादुकोण एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. कोणत्याही युवतीला हेवा वाटावा ...
डिप्पीला रणवीर म्हणतो, ‘बूब्बू’ ?
गेल्या काही वर्षांपासून ‘बेफिक्रे’ फेम रणवीर सिंग आणि ‘पद्मावती’ फेम दीपिका पादुकोण एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. कोणत्याही युवतीला हेवा वाटावा असा बॉयफ्रेंड दीपिकाजवळ आहे. त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. ते दोघे एकमेकांना खासगीत कोणत्या नावाने बोलावत असतील? एकमेकांचा मुड कसा सांभाळत असतील? त्यांच्या आवडीनिवडीपासून ते त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंत..पण तुम्हाला हे माहितीये का? रणवीरने दीपिकाचे टोपण नाव काय ठेवलेय ते? ‘बूब्बू’ या नावाने तो तिला नेहमी आवाज देत असतो. नुकत्याच झालेल्या एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्याने तिला याच नावाने आवाज दिला. दीपिकानेही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता हसत त्याच्याकडे गेली. याचाच अर्थ तिलाही त्याने ठेवलेले हे नाव प्रचंड आवडते. अलीकडेच झालेल्या अॅवॉर्डस फंक्शनमध्ये अर्जुनने दीपिकाच्या गालावर किस केला असता रणवीरच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागले, हे तुम्हाला ठाऊक आहेच. त्यानंतर नेहा धुपियाच्या चॅट शोवर बोलताना अर्जुनला विचारण्यात आले की, तुझ्यात आणि दीपिकात एकाला कुणालातरी निवडायचे झाल्यास रणवीर कुणाला निवडेल? त्यावर अर्जुन म्हणाला,‘ मीच नाही तर कुणाबद्दलही ही स्पर्धा असेल तर तो ‘बूब्बू’ लाच निवडणार!’ रणवीर-दीपिकाचं नातं किती घट्ट आहे हे आता काही वेगळं सांगायला नको. नाही का?