Join us  

Shamshera Trailer : ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 1:51 PM

Shamshera Trailer : 2.59 मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे.  ट्रेलर पाहताना ‘KGF’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

Shamshera Trailer : रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय दत्त ( Sanjay Dutt) व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांचा बहुचर्चित चित्रपट ‘शमशेरा’चा (Shamshera ) ट्रेलर रिजीज झालाय. यशराज बॅनरच्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि ट्रेलर रिलीज होताच, सोशल मीडिया के्रझी झाला आहे.‘शमशेरा’मध्येरणबीर कपूरसोबतसंजय दत्तही आहे आणि पुन्हा एकदा त्याचा अधीरासारखा धमाकेदार अवतार पाहायला मिळतोय. संजय दत्त या चित्रपटात शुद्ध सिंहची भूमिका साकारतोय.

कथा आहे 1871 सालची. ‘ये कहानी है उसकी, जो कहता था गुलामी किसी की अच्छी नहीं है और आझादी तुम्हें कोई देता नहीं... आझादी छिननी पडती है... ये कहानी है शमशेरा  की...,’या दमदार डायलॉगने ‘शमशेरा’च्या ट्रेलरची सुरूवात होते आणि रणबीरची एन्ट्री होते. ‘शमशेरा’चा ट्रेलर खिळवून ठेवतो. पाठोपाठ निर्दयी असलेल्या शुद्ध सिंगची एन्ट्री होते. दरोगा शुद्ध सिंह म्हणजे, या चित्रपटात विलन. संजय दत्तला दरोगा शुद्ध सिंहच्या भूमिकेत पाहताना थक्क व्हायला होतं.

रणबीर कपूरचा दमदार अ‍ॅक्शन अवतार, त्याचा लुक पाहतांना अंगावर रोमांच येतात. त्याला दरोडेखोराच्या रूपात पाहणं चाहत्यांसाठी एक सरप्राईजिंग ट्रिट आहे. ग्लॅमर गर्ल वाणी कपूरची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. 2.59 मिनिटांचा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे.  ट्रेलर पाहताना ‘केजीएफ’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ‘शमशेरा’चा ट्रेलर पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.

अशी आहे कथा..ही कथा आहे शमशेराची. तो वडिलांसारखा खूंखार असा दरोडेखोर बनतो आणि आपल्या टोळीसोबत इंग्रजांशी दोन हात करायला मैदानात उतरतो. इंग्रजांना नाकात दम आणणाºया या शमशेराला वठणीवर आणायला इंग्रजांकडून शुद्ध सिंगला पाठवण्यात येतो. आता या लढाईत कोण जिंकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे. येत्या 22 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

टॅग्स :शमशेरारणबीर कपूरसंजय दत्तवाणी कपूरबॉलिवूड