Join us

अनुष्का शर्माच्या लग्नावरून रणबीर कपूरने म्हटले, ‘मला दु:ख झाले अन् आनंदही झाला’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:42 IST

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सोशल मीडियावर ...

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सोशल मीडियावर तर सातत्याने विरुष्काच्या लग्नाचे फोटो शेअर केले जात आहे. मात्र त्याचबरोबर कधीकाळी अनुष्कासोबत नाव जोडलेल्या रणबीर कपूरलाही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. रणबीर-अनुष्कावरून इंटरनेटवर बरेचसे जोक्स समोर येत आहेत. गेल्या शुक्रवारी जेव्हा रणबीर ट्विटरवर आपल्या फॅन्स क्लबच्या माध्यमातून लाइव्ह आला तेव्हा त्याने चाहत्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर दिले. अशात विराट-अनुष्काच्या लग्नावरून त्याला प्रश्न विचारले जाणे स्वाभाविक होते. एका चाहत्याने रणबीरला विराट-अनुष्काच्या लग्नावरून प्रश्न विचारला असता, त्याने म्हटले की, ‘मला खरोखरच दु:ख होत आहे, कारण मला याविषयी काहीच माहिती नव्हते. परंतु मला याचा आनंदही होत आहे की, याअगोदर मी अनुष्काला कधीही एवढे खूश आणि सुंदर बघितले नव्हते.’ यानंतर रणबीरने म्हटले की, ‘मी माझ्या हातावर मेहंदी लावून बसलो होतो, परंतु त्या लोकांनी मला बोलावलेच नाही.’ यानंतर चाहत्यांनी त्याची मस्करी करताना म्हटले की, विराट-अनुष्काचे लग्न ‘चन्ना मेरेया’ हे गाणे गायिल्याशिवाय अपूर्णच म्हणावे लागेल.यावेळी एका चाहत्याने रणबीरला तू केव्हा लग्न करणार असे विचारले असता त्याने म्हटले की, ‘अगोदर माझ्यासाठी मुलगी तर शोधा’ यावेळी रणबीरला त्याच्या चित्रपट आणि व्यक्तिगत आयुष्याविषयीदेखील बरेचसे प्रश्न विचारले. रणबीरनेही दिलखुलासपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच रणबीरने हेदेखील मान्य केले की, ‘बेशरम, अनजाना अनजानी आणि बचना है हसीनों’ या चित्रपटांमध्ये त्याने चांगले काम केले. दरम्यान, रणबीर आणि अनुष्काची चांगली बॉन्डिंग होती. तो तिच्या लग्नात उपस्थित राहण्यास उत्सुक होता, असेच त्याच्या उत्तरांवरून दिसून आले.