बॉलिवूडचा हँडसम अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आगामी Animal सिनेमात दिसणार आहे. यातील त्याचा लुक प्रभावित करणारा आहे. लांब दाढी, मोठे केस आणि 'खुँखार' अवतार असणार आहे. यानंतर रणबीर अगदी अपोझिट 'रामायण' सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. या भूमिकेसाठी त्याने नॉनव्हेजही सोडल्याची बातमी आली होती. मात्र रणबीरने हा निर्णय सिनेमासाठी नाही तर एका वेगळ्या कारणामुळे घेतल्याचं सांगितलं आहे.
रणबीर कपूरची एक व्हिडिओ मुलाखत सध्या व्हायरल होतीये. यामध्ये तो म्हणतो,' सध्या माझं एकच लक्ष्य आहे. माझ्या मुलीसाठी मी लाईफस्टाईल बदलली आहे. मला निरोगी राहायचं आहे. यासाठी मी स्मोकिंग, ड्रिकिंग आणि नॉनव्हेजही सोडलं आहे. मी योगा आणि मेडिटेशन करत आहे. आता चाळीशीत मी मुलीसाठी आणि स्वत:साठीही स्वस्थ राहायचं ठरवलं आहे. त्यावरच मी सध्या लक्ष देतोय.'
लेक राहाच्या जन्मानंतर रणबीरचं आयुष्य बदललं आहे. राहा आणखी मोठी होईल तेव्हा तिच्यासोबत खेळण्यासाठी मी तेवढा फीट असलो पाहिजे अशी काळजी रणबीरला वाटतेय. म्हणून त्याने त्याच्या जीवनशैलीत बरेच बदल केलेत. राहा पुढील महिन्यात एक वर्षाची होणार आहे.