Join us

नीतू सिंगसह आलिया भट्टचे आहे जबरदस्त बॉन्डींग, वेळ मिळताच एकत्र करतात एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 13:12 IST

एयरपोर्टवर रणबीर कपूर आलिया भट्ट, नीतू सिंह , शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

कोरोना दरम्यानच अनेक सेलिब्रेटी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या कपलने. पहिल्यांदाच कपूर आणि भट्ट फैमिली ने राजस्थानमध्ये रणथंभौर येथे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. तीन दिवस दोन्ही कुटुंबाने एकत्र वेळ घालवला.  

एयरपोर्टवर रणबीर कपूरआलिया भट्ट, नीतू सिंह, शाहिन भट्ट, सोनी राजदान , अयान मुखर्जी दिसले होते. दोन्ही कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. 

ब-याच दिवसानंतर नीतू सिंग रणबीर आणि आलिया एकत्र एन्जॉय करताना दिसले. सतत शूटिंगमध्ये व्यस्त असताना एकमेकांना वेळही देणे अशक्य होते. म्हणूनच कपूर कुटुंबिय नेहमीच अशाप्रकारचे खास गेट टूगेदर करत असतात.

 

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आले. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. रणबीर कपूर शेवटचा राजकुमार हिराणीचा चित्रपट संजूमध्ये झळकला होता. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

अभिनेत्री आलिया भट्ट अगदी कमी वयातच जिने आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. '2 स्टेट्स', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'उडता पंजाब', 'हायवे', 'डिअर जिंदगी', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'राजी', 'गलीबॉय' सिनेमात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर