११ वर्षांनंतर रणबीर कपूरने जाहीरपणे सांगितली त्याची कमजोरी; करिअरला बसू शकतो फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 20:48 IST
रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याचे पोस्टर ...
११ वर्षांनंतर रणबीर कपूरने जाहीरपणे सांगितली त्याची कमजोरी; करिअरला बसू शकतो फटका!
रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याचे पोस्टर प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. रणबीर नुकताच दिल्ली येथे आयोजित केलेल्या आयफा पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. याचदरम्यान, रणबीरने त्याच्या आयुष्याशी निगडित रहस्याचा खुलासा केला आहे. हा खुलासा जाणून त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला अशक्य होणार आहे. रणबीर कपूर १९व्या आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमीचा पुरस्कार सोहळा होस्ट करताना बघावयास मिळणार आहे. यंदा हा सोहळा बॅँकॉकमध्ये रंगणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान, रणबीर कपूरने त्याच्या त्या कमजोरीविषयी सांगितले, ज्याबाबत लोक अजूनही अनभिज्ञ आहेत. रणबीर कपूरने मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘मी जेव्हा-जेव्हा स्टेजवर लाइव्ह परफॉर्मन्स करण्यास जातो तेव्हा प्रचंड घाबरतो. कारण जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्स करावा लागतो तेव्हा रिटेक मिळतो. एखादी चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाते. मात्र लाइव्ह परफॉर्मन्समध्ये असे काहीही नसते. त्यामुळे मला त्याची खूप भीती वाटते. त्याचबरोबर रणबीरने म्हटले की, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान तुम्हाला तुमचे बेस्ट द्यावे लागते. त्यामुळेदेखील मी नर्व्हस होत असतो. दरम्यान, या पत्रकार परिषदेत रणबीरसह निर्माता करण जोहर, दिया मिर्झा, कार्तिक आर्यन आणि शाहिद कपूर उपस्थित होते. दरम्यान, रणबीरचा ‘संजू’ हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर रणबीर ‘शमशेरा’ या चित्रपटातही बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला.