Join us  

आलिया-रणबीरने जोधपूरमध्ये घालवला निवांत वेळ, एका रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी मोजली इतकी मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 2:38 PM

पार्टी, सेलिब्रेशन यापेक्षा आलिया व रणबीर दोघांनीही निगर्साच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि हे जोडपं जोधपूरला पोहोचलं...

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीरचा ‘शमशेरा’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt ) दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांचं नातं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. कालचा अख्खा दिवस रणबीर कपूरने त्याची लेडीलव्ह आलिया भटसोबत घालवला. कारणही खास होतं. काल (28 सप्टेंबर) रणबीरचा वाढदिवस होता. पार्टी, सेलिब्रेशन यापेक्षा आलिया व रणबीर दोघांनीही निगर्साच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आणि हे जोडपं जोधपूरला पोहोचलं.  जोधपूरच्या सुजान जावई कॅम्पमध्ये त्यांनी  खासगी क्षण  घालवले. तलावाच्या काठी सूर्यास्ताचा आनंद घेतांना एक फोटो शेअर करून आलियाने रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात.

26 तारखेला रणबीर व आलिया जोधपूरला पोहोचलेत. याठिकाणी एक रिट्रिट आधीच बुक होतं. याचं एका दिवसाचं भाडं एक लाखांपेक्षाही अधिक आहे. याठिकाणी अनेक टेंट आणि सुइट्स आहेत, ज्याची किंमत प्रति रात्र 70 हजार रुपयांपासून ते 1.65 लाख रुपये आहे. यादरम्यान वन्यजीवांना जवळून पाहण्याची शिवाय स्थानिक संस्कृती अनुभवण्याची संधीही मिळते. 

या कॅम्पिंगचे आलिया व रणबीरचे काही फोटोही समोर आले आहेत.  एका फोटो दोघेही लेकसाईड मॅटवर सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसले.  यामध्ये आलिया पांढरा शर्ट आणि निळा डेनिम परिधान करताना दिसली, तर रणबीर कॅम्पिंगसाठी योग्य कपड्यांमध्ये दिसला.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीरचा ‘शमशेरा’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर यांनी एकत्र काम केलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर