Join us  

५० लाखांचं घड्याळ, लक्झरी कार, अलिशान घर..‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूरची संपत्ती पाहून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 8:09 AM

रणबीर कपूर हा ‘कपूर’ घराण्याचा वारसदार आहेच. शिवाय एक दमदार अभिनेताही आहे.

रणबीर कपूर हा सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘सावंरिया’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या रणबीरने ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘राजनीती’, ‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘ब्रह्मास्त्र’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. कपूर घराण्याचा ‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूर याचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. रणबीर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा आहे. कपूर कुटुंबात जन्म घेतलेल्या रणबीरने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.  

रणबीर कपूर हा ‘कपूर’ घराण्याचा वारसदार आहेच. शिवाय एक दमदार अभिनेताही आहे.  GQ Indiaनुसार, रणबीरची एकूण संपत्ती 337 कोटी रूपये आहे. चित्रपटांशिवाय जाहिरातींमधूनही तो बक्कळ कमाई करतो. एका रिपोर्टनुसार, रणबीर एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी फी घेतो आणि जाहिरातीसाठी सुमारे 5 कोटी रूपये चार्ज करतो.

रणबीरकडे मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंट आहे. अलिशान गाड्या तर विचारू नका. रणबीरकडे अलिशान BMW X6  गाडी आहे. याची किंमत 1.02 कोटी रूपये आहे. याशिवाय Lexus, Mercedes-Benz GL Class, Audi R8 आणि Range Rover अशा गाड्याही त्याच्याकडे आहेत.

दरम्यान, रणबीर 'एनिमल' या त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १ डिसेंबरला रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. याबरोबरच बॉबी देओल, शक्ती कपूर, परिणीती चोप्रा हे कलाकारही झळकणार आहेत.  रणबीरने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एप्रिल २०२२मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांतच रणबीर-आलिया आईबाब झाले. त्यांना राहा ही मुलगी आहे.

टॅग्स :रणबीर कपूर