Join us

‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या बालनबरोबर झळकणार रणबीर कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 16:27 IST

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या विद्या बालनच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नसली तरी, तिच्या अ‍ॅक्टिंगचे ...

गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या विद्या बालनच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नसली तरी, तिच्या अ‍ॅक्टिंगचे सर्वदूर कौतुक केले गेले. आता विद्या अतुल कसबेकर याच्या आगामी ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात काम करणार असून, यामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर झळकणार आहे. वास्तविक अद्यापपर्यंत याबाबतचा खुलासा होऊ शकला नाही; मात्र चित्रपटात रणबीर एका स्पेशल भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. विद्याच्या अपोझिट प्रसिद्ध थिएटर आर्टिस्ट मानव कॉल याची भूमिका असेल. मानवच्या मते ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट सर्वसामान्य लोकांची लव्हस्टोरी आहे. चित्रपटाची कथा मुंबई बेस्ड असून, एका सामान्य कुटुंबावर आधारित आहे. चित्रपटात मानवची भूमिका अशोक दुबेची असेल तर विद्या सुलोचना दुबेच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटात विद्याला प्रेमाने सुलू असे बोलवले जाते. दरम्यान, रणबीरच्या भूमिकेविषयी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नसली तरी तो चित्रपट गेस्ट अपीयरन्स म्हणून झळकण्याची शक्यता आहे. हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार आहे. विद्याने काही दिवसांपूर्वीच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, रणबीरसोबत काम करणे खूपच मजेशीर आहे. गेल्यावर्षांपासून विद्याचे अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत; मात्र त्यातील एकाही चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर हवा तसा करिष्मा दाखविला नाही. गेल्या वर्षी तिचा ‘कहानी-२’ हा चित्रपट रिलीज झाला होता; मात्र या प्रेक्षकांनी त्यास सपशेल नाकारले होते. त्यामुळे तिला ‘बेगम जान’कडून बºयाचशा अपेक्षा होत्या; मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविण्यात फारसा यशस्वी होऊ शकला नाही. आता तिला ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. तर रणबीरविषयी बोलायचे झाल्यास सध्या तो संजय दत्तवर आधारित बायोपिकमध्ये प्रचंड व्यस्त आहे. संजूबाबाला पडद्यावर तंतोतंत साकारण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बल १० वर्षांनंतर सोनम कपूर झळकणार आहे.