Join us  

अशी सुरु झाली होती रणबीर कपूर अन् दीपिका पादुकोणची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 10:39 AM

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची लव्हस्टोरी अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण ...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची लव्हस्टोरी अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा जगजाहिर होत असतानांच अचानक रणबीर व दीपिकाच्या ब्रेकअपची बातमी आली. कुठे माशी शिंकली, हे मात्र कुणालाच कळले नाही. खरे तर आम्हालाही अद्याप ते कळले नाही. अर्थात ब्रेकअपचे कारण आम्हाला ठाऊक नसले तरी या दोघांची लव्हस्टोरी कशी बहरली, हे मात्र आम्ही तुम्हाला सांगू शकणार आहोत. होय,   गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि दीपिकाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत रणबीर आणि दीपिकाने ते कसे प्रेमात पडले होते, याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत दीपिकाने रणबीरसोबतची पहिली भेट कशी अन् कधी झाली, हे सांगितलेय. पहिल्या सिनेमावेळी आम्ही केवळ एकमेकांची नावे ऐकली होती. आम्हा दोघांचे मेकअप आर्टीस्ट भरत आणि डोरिस हे होते.  रणबीर खूप चांगला मुलगा आहे आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटायला हवे, असे एकदिवस डोरिस मला म्हणाला. यानंतर एक दिवस डोरिसने अचानक रणबीरला बोलवून घेतले आणि आम्हाला एकमेकांसोबत बोलायला सांगितले. हीच आमची पहिली भेट होती, असे दीपिका या मुलाखती सांगितलेय.  याच पहिल्या भेटीत आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केलेत. त्यानंतर २००७ मध्ये आम्ही लंचला बाहेर गेलो. पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवला. त्यानंतर आमच्या नियमीत भेटीगाठी सुरू झाल्या. ‘मिस्टर बीन’ हा आम्ही एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा होता. त्यानंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो आणि त्यानंतर रणबीरने मला घरी सोडले.    २३ फेब्रुवारी २००८ पासून आम्ही एकमेकांना डेट करणे सुरु केले होते, असेही ती म्हणाली.रणबीरनेही काही आठवणींना या मुलाखतीत उजाळा दिलाय.  मला आठवते की, दीपिकाने पांढ-या रंगाची लिनेन पँट कॅरी केली होती आणि केस गुंडाळले होते. दीपिकाची मला आवडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिची सकारात्मक विचारसरणी, असे त्याने या मुलाखतीत सांगितलेय.अर्थात हे कपल आता वेगवेगळे झाले आहे. दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह आहे आणि रणबीरचे म्हणाल तर कॅटरिना कैफशी ब्रेकअप झाल्यानंतरपासून तो सिंगल आहे.