Join us  

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण पुन्हा एकदा दिसणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 6:00 AM

रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केले आहे आणि त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप भावलेदेखील आहेत.

ठळक मुद्देदीपिका व रणबीर प्रेक्षकांची फेव्हरिट जोडीदीपिका व रणबीर करू शकतात एकत्र काम

अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. या दोघांनी काम केलेल्या सिनेमांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रणबीर व दीपिका बचना ए हसीनो, ये जवानी है दीवानी व तमाशा यांसारख्या सिनेमात एकत्र झळकले आहेत. या सिनेमामधील त्यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे बोलले जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, लव रंजनच्या आगामी चित्रपटासाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे आणि या सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारण्यात आले आहे. दीपिका स्क्रिप्ट ऐकली आहे. मात्र अद्याप तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिलेला नाही. जर तिने होकार दिला तर ते दोघे पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसतील. लव रंजनच्या या सिनेमाबद्दल रणबीर कपूर म्हणाला की, मला लव रंजनसोबत काम करायचे होते. दीपिका व रणबीर प्रेक्षकांची फेव्हरिट जोडी आहे आणि ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतरही त्यांचे नाते चांगलेच राहिले. ते नेहमी एकमेकांचे कौतूक करताना दिसतात. रणबीर ब्रह्मास्त्र व शमशेरा सिनेमात झळकणार आहे. दीपिका, मेघना गुलजार यांच्या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती मेघना गुलजार करणार आहेत. हा चित्रपट महिला प्रधान असणार आहे आणि त्यात दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अॅसिड विक्टिम लक्ष्मी अग्रवालच्या कथेवर आधारीत असणार आहे.  

टॅग्स :दीपिका पादुकोणरणबीर कपूर