Join us  

काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 10:23 AM

Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding : सध्या बी-टाऊनमध्ये आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: या लग्नाच्या तारखेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding date : सध्या बी-टाऊनमध्ये आलिया भटरणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: या लग्नाच्या तारखेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात आहे. रणबीरच्या संपूर्ण  कुटुंबाने यावर चुप्पी साधली आहे. दुसरीकडे आलियाच्या कुटुंबात वेडिंग डेटबद्दल कन्फ्यूजन दिसतंय.आलियाचे अंकल रॉबिन भट यांनी कालपरवा आलिया व रणबीरच्या लग्नाच्या तारखांबद्दल खुलासा केला होता. येत्या 13 तारखेला कपलची मेहंदी असेल आणि 14 तारखेला लग्न होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट याने आलियाच्या लग्नाच्या तारखेबद्दल वेगळाच खुलासा केला आहे.

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल भटने लग्नाच्या तारखेबद्दल वेगळाच खुलासा केला. लग्नासाठी आधी 13 आणि 14 ही तारीख ठरवण्यात आली होती. पण मीडियात तारखा लीक झाल्याने आणि सुरक्षा कारणास्तव आता लग्नाची तारीख बदलण्यात आल्याचं राहुल भटने सांगितलं.तो म्हणाला, लग्न होतंय, हे सर्वांनाच कळून चुकलं आहे. पण लग्न 13 व 14 एप्रिला नाहीये. आधी ही तारीख ठरवण्यात आली होती. पण आता सगळं काही बदललं आहे. कारण खूप प्रेशर आहे. 13 व 14 ला लग्न नाही, मी हे खात्रीपूर्वक सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे लग्नाच्या तारखेबद्दल लवकरच मीडियासमोर घोषणा होईल.

आलियाचे डॅड, रणबीरची मॉम म्हणाली...आलियाचे डॅड महेश भट यांनी लग्नाच्या तारखेबद्दल बोलण्यास नकार दिला. नीतू कपूर यांच्याकडून मला सक्त ताकिद देण्यात आली आहे. त्यामुळे मी याबद्दल काहीही बोलणार नाही. मी त्यांचं म्हणणं कसं टाळू शकतो? असं ते हसत हसत म्हणाले. रणबीरची मॉम नीतू कपूर यांनी तर लग्नाच्या तारखांचा प्रश्नच उडवून लावला. मी दोन वर्षांपासून कपलच्या लग्नाबद्दल ऐकतेय. मीडियात रोज एक नवी तारीख येते. मी इथे शोमध्ये आहे. काय माहित, माझ्या माघारीच आलिया व रणबीर लग्न उरकतील? लग्नाबद्दल ज्या काही तारखा ठरतील त्याबद्दल लोकांना कळेलच, असं नीतू कपूर त्यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाल्या. 

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भट