Join us  

Ranbir & Alia: बाळाच्या जन्मापूर्वीची रणबीर-आलियामध्ये भांडण, छोट्याशा कारणावरून झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 2:34 PM

Ranbir Kapoor and Alia Bhatt: बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील सध्याच्या काळातील प्रसिद्ध कपल्सपैकी एक असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टबाबत जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. हे जोडपं लवकरच खूशखबर देणार आहे. त्याबाबत त्यांच्या फॅन्समध्येही उत्सुकता आहे. मात्र बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे.

रणबीर आणि आलिया लवकरच आई-वडील बनणार आहेत. आलिया भट्टने जून महिन्यात इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूरने सांगितले की, त्यांनी बाळाच्या या जगातील स्वागतासाठी तयारी पूर्ण केली आहे. मात्र जोडप्याचं एका छोट्याशा कारणावरून भांडण झालं आहे.

रणबीर म्हणाला की, आम्ही सर्व तयारी पूर्ण केलीय. बाळासाठी खोली तयार आहे. मात्र एका पुस्तकावरून आमच्यात भांडण होत आहे.  आलियानं ते पुस्तक वाचलं आहे. तसेच मी सुद्धा ते पुस्तक वाचावं, असं तिला वाटतं. मी  ते पुस्तक केवळ ३० टक्केच वाचलं आहे. तसेच पुस्तकं आपल्या बाळाचं संगोपन कसं करावं याबाबत सांगू शकत नाही, असं मी तिला सांगितलंय. जेव्हा बाळ येईल, तेव्हा त्याचा अनुभव घेता येईल. मात्र या मुद्द्यावरून आम्हा दोघांमध्ये खूप वाद झाला.

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्र हा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झाला होता. अयान मुखर्जींनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये या दोघांशिवाय मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन हेसुद्धा होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.  

टॅग्स :बॉलिवूडरणबीर कपूरआलिया भट