रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. आलियाच्या डोळ्यांत तर अश्रू तरळले. थेट प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित केला गेला. कुंभमेळ्यातील हजारो भाविकांच्या साक्षीने १५० ड्रोनच्या साहाय्याने खुल्या आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित करण्यात आला. आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चे नाव रेखाटले गेले. केवळ इतकेच नाही तर आलिया व रणबीरने चित्रपटात साकारल्या पात्रांची नावेही ड्रोनच्या मदतीने आकाशात कोरली गेलीत. या चित्रपटात आलियाने ईशा नावाचे पात्र साकारले आहे तर रणबीरने शिवा नावाची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे.
Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 11:21 IST
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले.
Brahmastra Logo Launch : कुंभमेळ्यात रंगला आलिया भट्ट- रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’चा अनोखा सोहळा!
ठळक मुद्दे‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.