Join us  

आलिया भट आणि रणबीर कपूर गेले मुव्ही डेटवर, पाहिला हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 2:33 PM

नुकतेच रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना मुंबईत एकत्र पाहाण्यात आले. ते दोघे मुव्ही डेटवर गेले होते.

ठळक मुद्देलोअर परेल मधील पीव्हीआरमध्ये अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. या स्क्रिनिंगला आलिया आणि रणबीर यांना एकत्र पाहाण्यात आले. रणबीर जीन्स आणि चेक्सच्या शर्टमध्ये दिसला तर आलिया जीन्स आणि टॉपमध्ये दिसली.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर रणबीर आणि आलिया एकमेकांत गुंतले आणि सोनम कपूरच्या लग्नात त्यांनी एकत्र हजेरी लावत आपले नाते जगजाहीर केले. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले. 

आता नुकतेच त्या दोघांना मुंबईत एकत्र पाहाण्यात आले. ते दोघे मुव्ही डेटवर गेले होते. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे नुकतेच स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत झाले. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. लोअर परेल मधील पीव्हीआरमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. या स्क्रिनिंगला आलिया आणि रणबीर यांना एकत्र पाहाण्यात आले. रणबीर जीन्स आणि चेक्सच्या शर्टमध्ये दिसला तर आलिया जीन्स आणि टॉपमध्ये दिसली. यावेळी आलिया रणबीरच्या मागोमाग चालताना दिसली तर गर्दीतून मार्ग काढताना तो तिची काळजी देखील घेताना दिसला. हे दोघे हा चित्रपट पाहाण्यास खूप उत्सुक असल्याचे त्यांच्या एक्सप्रेशनवरून कळून येत होते. 

आलिया आणि रणबीरचे नाते कपूर कुटुंबाने मान्य केले आहे. हेच कारण आहे की, आलिया अनेकदा कपूर कुटुंबासोबत दिसली आहे. आलियाने यंदाचे न्यू ईअर देखील कपूर कुटुंबासोबत साजरे केले. याआधीही अनेकदा आलिया रणबीरच्या कुटुंबासोबत दिसली.  

आलिया आणि रणबीर लग्न करणार, अशी चर्चा होती. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जात होते. पण सध्या त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाहीये. पण ते लवकरच लिव्ह इनमध्ये मध्ये राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी ते सध्या नव्या घराचा शोध देखील घेत असल्याची चर्चा रंगली आहे. लिव्ह इनमध्ये मध्ये राहाण्याचा सल्ला त्यांना रणबीरची आई नीतू सिंग यांनीच दिला असून आलिया लग्नासाठी अद्याप तयार नाही. खुद्द आलियाचे कुटुंबही तिने लग्नाचा निर्णय घेताना घाई करू नये, या मताचे आहे. कदाचित त्याचमुळे नीतू यांनी हा मध्यममार्ग सुचवला असेल असे म्हटले जाते. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटअ‍ॅवेंजर्स- एंडगेम