Join us  

‘सैफिना’, ‘विरूष्का’ झाले जुने, आता ट्रेंडमध्ये आहे ‘रालिया’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:43 PM

अलीकडे बॉलिवूडच्या नट-नट्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या पडल्या काही गोष्टी ट्रेंड करायला लागतात. साहजिकचं हा जमानाचं ट्रेंडिंगचा आहे. ‘रालिया’ हे ‘एक्रोनियम’ सध्या जाम ट्रेंडमध्ये आहे.

अलीकडे बॉलिवूडच्या नट-नट्या एकमेकांच्या प्रेमात पडल्या पडल्या काही गोष्टी ट्रेंड करायला लागतात. साहजिकचं हा जमानाचं ट्रेंडिंगचा आहे. तुम्हाला आठवतं असेल की, सैफ अली खान व करिना कपूर एकमेकांना डेट करू लागल्याबरोबर ‘सैफिना’ हे नाव ट्रेंडमध्ये आले होते. यानंतर अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या डेटींगच्या बातम्या कानावर आल्या आल्या लोकांनी या कपलला ‘विरूष्का’ हे नाव दिले होते. केवळ इतकेच नाही तर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना चाहत्यांनी ‘दीपवीर’ हे नाव बहाल केले होते. या नावांना ‘एक्रोनियम’ (संक्षिप्त रूप)असे म्हणतात. सध्या असेच ‘एक्रोनियम’ ट्रेंडमध्ये आहे. तूर्तास कुण्या हॉट कपलच्या डेटींगची चर्चा आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. होय, आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या डेटींगची सध्या कधी नव्हे इतकी चर्चा आहे.   केवळ चर्चाचं नाही तर हे कपल २०२० मध्ये लग्न करणार, अशीही माहिती निकटच्या गोटातून मिळाली आहे. आता तर रणबीर व आलियाचे एकमेकांशिवाय पान हलत नाही, अशी स्थिती आहे. दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसत आहे. अगदी अलीकडे आलिया रणबीरच्या फॅमिलीसोबत डिनर एन्जॉय करताना दिसली होती. यानंतर ती पुन्हा रणबीरसोबत संजय दत्तच्या घरी दिसली. याच कथित लव्ह बर्ड्सला चाहत्यांनी ‘रालिया’ हे नाव बहाल केले आहे. ‘रालिया’ हे ‘एक्रोनियम’ सध्या जाम ट्रेंडमध्ये आहे.विशेष म्हणजे, खुद्द रणबीर कपूरलाही याची कल्पना आहे. अलीकडे एका मुलाखतीत याबद्दल रणबीरला छेडले गेले. सध्या एक नवे ‘एक्रोनियम’ ट्रेंडमध्ये आहे, तुला ठाऊक आहे का, असा प्रश्न त्याला केला गेला. यावर रणबीरने थेट बोलणे टाळले, पण हे ‘एक्रोनियम’ कुणाबद्दल आहे, हे मात्र इशा-या इशा-यात त्याने सांगितले.

 ‘नाही, काय ट्रेंडमध्ये आहे, मला ठाऊक नाही. पण हे ‘एक्रोनियम’ माझ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी वापरले जावे, असे मला वाटतेय. कारण हा चित्रपट आम्ही सोबत सोबत करतोय,’असे रणबीर म्हणाला.  आता ‘ब्रह्मास्त्र’मध्ये कोण आहे, हे सांगायला नकोच. होय, आलिया व रणबीर यात लीड रोलमध्ये आाहेत.एकंदर काय तर रणबीरलाही चाहत्यांनी दिलेले हे नाव पसंत आहे, एवढा एक सरळ साधा तर्क यावरून काढला जात आहे.

 

टॅग्स :रणबीर कपूर