Join us

रणबीर-आलियाची जोडी ख्रिसमस आणि न्यू इअर सेलिब्रेट करणार 'या' शहरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 13:38 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्याला नात्याला घेऊन खूप ओपन आहेत. नुकताच कॉफी विद करणमध्ये आलियाने आपलं नातं अप्रत्यक्षपणे स्वीकारले आहे

ठळक मुद्देआलिया आणि रणबीर दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला आधीच मंजूरी दिली आहे'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया व रणबीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्याला नात्याला घेऊन खूप ओपन आहेत. नुकताच कॉफी विद करणमध्ये आलियाने आपलं नातं अप्रत्यक्षपणे स्वीकारले आहे. सार्वजनिक ठिकाणी, पार्टीच्या ठिकाणी हे दोघे एकत्र स्पॉट होतात. ख्रिसमस आणि न्यू इअरदेखील दोघे एकत्र सेलिब्रेट करणार आहेत. 

  

रिपोर्टनुसार आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून रणबीर-आलिया ख्रिसमसच्या आधी न्यूयॉर्कला जाणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये रणबीरचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर आई आधीपासूनच आहेत.     

आलिया आणि रणबीर दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला आधीच मंजूरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या वर्षी हे कपल लग्नाच्या बेडीत अडू शकतो. दोघांच्या कुटुंबीयांकडून देखील त्यांच्या नात्याला मान्यता देण्यात आलेली आहे.  

 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया व रणबीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे.याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा हिच्यासोबतही आलिया दिसली आहे. रणबीरही अर्ध्या रात्री आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला आहे. आलियाची आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. नीतू सिंग व सोनी राजदान या दोघींनी अलीकडे रणबीरचा ‘संजू’ हा चित्रपट एकत्र पाहिला होता.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर