Join us

राणा दुग्गबती या अभिनेत्रीसोबत होता नात्यात, त्यानेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 13:30 IST

राणा एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. राणानेच ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली होती.

ठळक मुद्देकरणने राणाला त्रिशाबद्दल विचारले असता त्रिशा ही माझी अनेक वर्षांपासून खूप चांगली फ्रेंड असल्याचे त्याने सांगितले होते. एवढेच नव्हे तर काही वर्षं आम्ही नात्यात होतो. पण काही कारणास्तव आमचे ब्रेकअप झाले अशी देखील कबुली राणाने दिली होती. 

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. राणा एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. राणानेच ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली होती.

बाहुबली या चित्रपटातील राणा दग्गुबती, प्रभास आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात काही महिन्यांपूर्वी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राणाला त्याच्या खाजगी आयुष्याविषयी करणने विचारले होते. राणा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन हे नात्यात असल्याची अनेक वर्षं चर्चा होती. पण त्यांनी याविषयी काहीही न बोलणेच पसंत केले होते. करणने त्याला त्रिशाबद्दल विचारले असता त्रिशा ही माझी अनेक वर्षांपासून खूप चांगली फ्रेंड असल्याचे त्याने सांगितले होते. एवढेच नव्हे तर काही वर्षं आम्ही नात्यात होतो. पण काही कारणास्तव आमचे ब्रेकअप झाले अशी देखील कबुली राणाने दिली होती. 

राणा काही वर्षांपूर्वी नं 1 यारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. या कार्यक्रमातील एका भागात राणाने सांगितले होते की, त्रिशा आणि मी नात्यात होतो. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे आम्ही वेगळे झालो. तुम्ही दोघेही चित्रपटसृष्टीत असाल तर तुम्हाला एकामागोमाग अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करावे लागते. यामुळे तुमचे आयुष्य प्रचंड बिझी असते. त्यामुळे काही नाती टिकत नाहीत. 

त्रिशाने काही वर्षांपूर्वी चेन्नईमधील वरुण मॅनियन या व्यवसायिकासोबत साखरपुडा केला होता. पण काही काळानंतर त्यांचा साखरपुडा तुटला. त्रिशा तिच्या खाजगी आयुष्याविषयी न बोलणेच पसंत करते. 

राणा लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन कमी केले आहे. 

टॅग्स :राणा दग्गुबतीबाहुबली