Join us  

Ram Gopal Varma Trolled: अभिनेत्रीच्या पायाची घेतली पप्पी; राम गोपाल वर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 6:10 PM

Ram Gopal Varma Trolled: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहेत.

Ram Gopal Varma Video: चित्रपट दिग्दर्शक/निर्माते राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचित्र कृत्यांसह चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका विचित्र कृत्यासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक आशु रेड्डीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते तिच्या पायांची पप्पी घेताना दिसत आहेत.

राम गोपाल वर्मांचे आशु रेड्डी सोबतचो फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकीकडे चाहते राम गोपाल वर्मांना यासाठी ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे काहीजण लकीदेखील म्हणत आहेत. RGVने आशु रेड्डी च्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते अभिनेत्रीच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांना RGVचे वर्तन खूप विचित्र वाटत आहे. 

RGV ट्रोल्सच्या निशाण्यावर 

या व्हायरल व्हिडीओमध्ये राम गोपाल वर्मा सांगतात की महिलांशी कसे वागले पाहिजे. यावेळी ते जमिनीवर बसतात आणि आशु रेड्डीच्या पायाचे चुंबन घेतातच, पण तिच्या पायाची बोटंही ओठांना लावतात. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटिझन्स दिग्दर्शकाला ट्रोल करत आहेत. हा व्यक्ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही थराला जातो, असे एकाने म्हटले. 

दुसऱ्याने म्हटले की, कधीकधी मला RGV साठी खूप वाईट वाटते. एकेकाळी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील शीर्ष दिग्दर्शकांपैकी एक होते... आणि आता...अजून एकाने लिहिले, भविष्यात स्पा आणि मसाज थेरपी सेंटर सुरू करण्याची काही योजना आहे का? 

टॅग्स :राम गोपाल वर्माबॉलिवूडट्रोल