Join us  

शाहरुखच्या 'त्या' वक्तव्यावर संतापली रामचरणची मेकअप आर्टिस्ट; म्हणाली, 'त्यांचा असा अपमान..'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 1:25 PM

Bollywood news: शाहरुखने केलेल्या त्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हणाला होता किंग खान?

गुजरातमधील जामनगर येथे नुकताच राधिका आणि अनंत अंबानी यांचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये देशविदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात कलाविश्वातील काही सेलिब्रिटींचाही समावेश होता.  यावेळी पार पडलेल्या संगीत नाईटमध्ये अभिनेता शाहरुख खान याने दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण याची खिल्ली उडवली. ज्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर आता रामचरणच्या मेकअप आर्टिस्टने एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

राधिका आणि अनंत यांच्या संगीत नाईट्समध्ये बॉलिवूडच्या तीनही खानने 'RRR' या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्यावर ताल धरला. या गाण्यातील हूक स्टेप शाहरुख, सलमान आणि आमिर यांनी केली. यावेळी अनंत अंबानी याने रामचरणला स्टेजवर येण्याची विनंती केली. परंतु, यावेळी शाहरुखने (shahrukh khan)  ज्या पद्धतीने रामचरणच्या (ram charan) नावाचा उल्लेख केला ते ऐकून चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.

शाहरुखने रामचरणला स्टेजवर बोलवताना ‘इडली वडा राम चरण, आप कहां हैं?’ असं म्हणत हाक मारली. परंतु,यावेळी शाहरुखने इडली वडा असा उल्लेख करत रामचरणला हाक मारली हे पाहून त्याची मेकअप आर्टिस्ट संतापली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाली रामचरणची मेकअप आर्टिस्ट?

‘इडली वडा राम चरण, आप कहां हैं?’ राम चरणसारख्या स्टार्सचा असा अपमान…या प्रकारानंतर मी तिथे थांबूच शकले नाही. मी शाहरुख खानची चाहती आहे, पण त्याने राम चरणसाठी जे शब्द वापरले ते मला जराही आवडलं नाही,’ असं म्हणत  झेबा हसन हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, झेबाने ही पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली. काहींनी शाहरुखची बाजून सावरुन घेतली. तर, काहींनी त्याला ट्रोलदेखील केलं.

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानराम चरण तेजाTollywoodअनंत अंबानी