Join us

राखी सावंतचा ‘होणारा’ नवरा दीपक कलालची ‘लाईव्ह धुलाई’; पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 13:19 IST

काही दिवसांपूर्वी दीपक कलाल ड्रामा क्विन राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. पण हे लग्नही निव्वळ एक ड्रामा होता. आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता  राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एका व्हिडिओमुळे.

ठळक मुद्देहोय, या व्हिडिओत दीपक कलाल एका व्यक्तिकडून बेदम मार खातांना दिसतोय. तूर्तास तरी हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.

यु ट्यूबर दीपक कलाल आपल्या ‘ऊटपटांग’ व्हिडिओसाठी ओळखला जातो. दीपक रोज नवे चित्रविचित्र व्हिडिओ शेअर करतो आणि लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतो. काही दिवसांपूर्वी दीपक कलाल ड्रामा क्विन राखी सावंतसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. पण हे लग्नही निव्वळ एक ड्रामा होता. आता राखी सावंतचा हा ‘बनता बनता  राहिलेला नवरा’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पुन्हा एका व्हिडिओमुळे. पण हा व्हिडिओ त्याच्या आधीच्या व्हिडिओपेक्षा एकदम वेगळा आहे.

होय, या व्हिडिओत दीपक कलाल एका व्यक्तिकडून बेदम मार खातांना दिसतोय. तूर्तास तरी हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात एक व्यक्ती दीपकला चांगलाच चोप देतोय. शिवाय तुझ्या ‘ऊटपटांग’ व्हिडिओमुळे मुले बिघडत आहेत, असा आरोप करताना दिसतोय. विशेष म्हणजे, दीपक मारणाºया व्यक्तिसमोर रडत रडत पुन्हा असे व्हिडिओ शेअर करणार नसल्याचे म्हणतोय. 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ गुरुग्राममधील असल्याचा दावा केला जात आहे. मारणा-या व्यक्तिने जाणीवपूर्वक दीपक कलालची ‘लाईव्ह धुलाई’ केली, असेही काही वृत्तात म्हटले गेले आहे. अर्थात काही लोकांच्या मते, हा सुद्धा दीपक कलालचा एक पब्लिसिटी स्टंट आहे. शेवटी पब्लिसिटीसाठी काहीपण...ही दीपक कलालची जुनी सवय आहे.  

सोशल मीडियावरच्या त्याच्या प्रोफाईलनुसार, दीपक कलाल एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. गोव्यात त्याचे एक हॉटेलही आहे. २०११ मध्ये काश्मिरातून त्याचा पहिला व्हिडिओ आला. यानंतर त्याचे अनेक अ‍ॅडल्ट व्हिडिओही आलेत. या व्हिडिओसाठी तो प्रचंड ट्रोलही 

टॅग्स :राखी सावंत