Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘ड्रिम मॅन’ म्हणणाऱ्या राखी सावंतने म्हटले ‘मोदीजी, हा पाहा तुमचा जावाई’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 18:01 IST

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती त्यांना वडील संबोधत त्यांच्या होणाºया जावायाची ओळख करून देताना दिसत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी राखी नेहमीच काही ना काही विचित्र कारनामे करीत असते. तुम्हाला कदाचित  आठवत असेल की, तिने तिच्या ब्लॅक ड्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो लावले होते. ऐवढेच नव्हे तर तिने मोदींना ‘ड्रीम मॅन’ असे म्हटले होते. राखीने यावेळी हे स्पष्ट केले होते की, पंतप्रधान मोदी यांना प्रभावित करण्यासाठीच त्यांचे फोटो असलेला ड्रेस मी परिधान केला होता. आता या घटनाक्रमात एक मजेदार ट्विस्ट आला आहे. होय, राखीने आता मोदींना तिचे वडील असे संबोधले आहे. गेल्या आठवड्यात राखीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये राखी तिच्या होणाºया कथित नवºयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख करून देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणत आहे की, ‘मित्रांनो मला सर्वच म्हणत होते की, तुला ‘दुल्हा’ कधी मिळणार. हे बघा, मला दुल्हा मिळाला.’ या व्हिडीओमध्ये राखी सावंत कार चालविणाºया एक व्यक्तीकडे इशारा करताना म्हणत आहे की, ‘हा माझा दुल्हा आहे.’ राखी म्हणते की, ‘मी आता न्यू यॉर्कला असून, हा माझा दुल्हा आहे.’ राखी त्या कारचालकाला म्हणतेय की, स्वीटहार्ट हाय बोलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसह सर्व भारतीय तुला बघत आहेत. मोदीजी माझे खूप मोठे चाहते आहेत. त्यानंतर राखी म्हणते की, ‘मोदीजी तुमच्या जावायला भेटा’. वास्तविक हा व्हिडीओ बघून असे वाटत आहे की, राखी हे सर्व काही मस्तीच्या मुडमध्ये म्हणत असावी. राखीने २००९ मध्ये ‘स्वयंवर’ नावाच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये सर्व विधीनुसार लग्न केले होते. या शोमध्ये तिने कॅनडाच्या इलेश पारूजनवाला याच्याशी साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांतच या दोघांचे नाते तुटले. त्यानंतर टाइम्स आॅफ इंडियाला राखीने सांगितले होते की, हे सर्व काही मी पैशांसाठी केले होते. राखीने म्हटले होते की, ‘मी पैशांसाठीच इलेशबरोबर साखरपुडा केला होता. मला एक फ्लॅट खरेदी करायचा होता. मी खोटं का बोलू? मी कोणासोबत केवळ याकरिता लग्न करू इच्छित नाही, जेणेकरून मला नंतर त्याला घटस्फोट द्यावा लागेल.’  ">http://दरम्यान, राखीच्या या व्हिडीओने सध्या चांगलीच खळबळ उडाली असून, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.