Join us  

OMG!! अखेर 8 महिन्यानंतर राखी सावंतने शेअर केले लग्नाचे फोटो, नवराही दिसला सोबत पण...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 9:58 AM

‘मेरी शादी की पिक्चर’ असे लिहित राखीने हा फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देअद्यापही राखीने लग्न केले, हे मानायला लोक तयार नाहीत.

ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या कित्येक महिन्यांपासून जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचे सीक्रेट मॅरेज. होय, गेल्या वर्षी 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. अगदी लग्नाची बातमी लीक होऊ नये म्हणून हॉटेलच्या रूममध्ये लग्न झाले होते. आधी राखीने लग्नाची बातमी ठामपणे नाकारली आणि नंतर मात्र होय, मी लग्न केले, अशी कबुली दिली. माझ्य पतीचे नाव रितेश असून तो एनआरआय असल्याचे तिने सांगितले. पण अद्याप राखीचा पती दिसतो कसा, हे मात्र कळायला मार्ग नाही. कारण राखीने अद्याप त्याचा एकही फोटो शेअर केलेला नाही. पण आता लग्नाच्या 8 महिन्यानंतर राखीने लग्नाचा फोटो शेअर केलाय.

होय, राखीने इन्स्ट्रावर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती वधूच्या पोशाखात आहे आणि तिच्या हातात तिच्या नव-याचा हात आहे. मात्र याही फोटोत राखीच्या नव-याचा चेहरा दिसत नाही. मोठ्या चतुराईने त्याने त्याचा चेहरा लपवला आहे. ‘मेरी शादी की पिक्चर’ असे लिहित राखीने हा फोटो शेअर केला आहे.

याआधीही राखीने लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. पण एकही फोटोत तिचा पती दिसला नाही. राखीने पतीचा एकही फोटो शेअर न केल्याने हे लग्नही तिचा एक ड्रामा असावा, असा अनेकांचा समज झाला होता.

अद्यापही राखीने लग्न केले, हे मानायला लोक तयार नाहीत. पण राखीचे मानाल तर तिच्या पतीला मीडियासमोर यायचे नाही. आता कधीपर्यंत ते तर काळच सांगेल.   

टॅग्स :राखी सावंत