Join us  

मेरे लिए दिल में घंटी बजती है क्या?  ‘या’ प्रश्नाने सुरु झाली राखी सावंत व राकेशची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 10:39 AM

राखीच्या पतीचे नाव राकेश आहे. तो युकेचा राहणारा आहे. राखी व राकेशची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, याचाही खुलासा झालाय.

ठळक मुद्दे मीडियात काहीही लीक होऊ नये, ही त्याची इच्छा होती. तो बिझनेस मॅन आहे आणि अतिशय समंजस व्यक्ती आहे, असेही राखीने सांगितले.

‘होय, मी लग्न केले आहे. आधी मी हे मान्य केले नाही. कारण मी घाबरले होते. मात्र आता मी लग्न केल्याची बातमी स्वत: तुमच्याशी शेअर करतेय. माझा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे स्पष्ट करत राखी सावंतने आपल्या लग्नाची कबुली दिली. इतका चांगला नवरा मिळाल्याबदद्ल तिने परमेश्वराचे आभारही मानलेत.

राखीच्या पतीचे नाव राकेश आहे. तो युकेचा राहणारा आहे. राखी व राकेशची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, याचाही खुलासा झालाय. राखीने स्वत: या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, हे सांगितले. तिने सांगितले की, प्रभु चावला यांच्यासोबतची माझी एक मुलाखत पाहून तो माझा फॅन बनला. यानंतर त्याने मला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज केला आणि आम्ही एकमेकांशी बोलू लागलो. काहीच दिवसांत आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. एकदिवस त्याने मला अप्रत्यक्ष प्रपोज केले. माझ्या एका मित्राला तू आवडतेस, त्याच्याशी लग्न करशील, असे त्याने मला विचारले. यावर का? असे मी त्याला विचारले. शिवाय दिल में घंटी नहीं बजी, असेही त्याला म्हणाले. माझ्या या बोलण्यावर, मेरे लिए दिल में घंटी बजती है क्या? असा प्रश्न त्याने मला केला. यावर मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. केवळ मला विचार करण्यासाठी वेळ दे, एवढेच म्हणाले. यानंतर बरेच दिवस गेले. पण या दिवसांत मी राकेशच्या प्रेमात असल्याचे मला जाणवले. हे सगळे अचानक झाले.

अनेकांना विश्वास बसणार नाही, पण लग्नाच्या 15 दिवसांआधी मी पहिल्यांदा भेटले. तो भेटला आणि हाच तो, असे मला वाटले. माझ्या घरच्यांनाही तो आवडला. लग्नाच्या दिवशी माझी आई, माझा भाऊ हजर होते. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने आम्ही विवाह केला. त्याआधी आम्ही नोंदणी पद्धतीने विवाह केला. राकेश याला या लग्नाचा गवगवा नको होता. मीडियात काहीही लीक होऊ नये, ही त्याची इच्छा होती. तो बिझनेस मॅन आहे आणि अतिशय समंजस व्यक्ती आहे, असेही राखीने सांगितले.

टॅग्स :राखी सावंत