Join us  

 मला माफ कर दीपक! ‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ‘ड्रामा’!!  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 11:45 AM

राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राखी दीपक कलालवर गंभीर आरोप करताना दिसतेय.

ठळक मुद्देया व्हिडिओनंतर युजर्सनी राखीला पुन्हा एकदा फैलावर घेतले आहे. हा सुद्धा राखीचा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचे युजर्सनी म्हटले आहे.

ड्रामा क्विन राखी सावंतने अलीकडे दीपक कलानसोबत लग्न करणार असे जाहिर केले अन् सोशल मीडियावर खळबळ माजली. राखीने सोशल मीडियावर लग्नाचे कार्डही शेअर केले.  इतकेच नाही दीपकसोबत प्रेस कॉन्फरन्सही घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखी व दीपक कलाल यांनी एकमेकांना अश्लिल बोलून, अश्लिल शिव्या देऊन निव्वळ ड्रामेबाजी केली. आता यानंतर राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राखी दीपक कलालवर गंभीर आरोप करताना दिसतेय. केवळ इतकेच नाही तर माझे कुटुंब तुझ्यावर खूप नाराज आहे, असे सांगत सोशल मीडियावर दीपकला ब्लॉक करण्याचा इशाराही राखीने दिला आहे.

मला माफ कर दीपक, माझे कुटुंब तुझ्यावर खूप नाराज आहे. जे काही झाले, ते त्यांना अजिबात आवडलेले नाही. मी १४-१५ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. मी खूप मेहनत केलीय. मी माझ्या कुटुंबाला सांभाळत आहे. त्यामुळे मला घाणेरडी पब्लिसिडी नकोय. जे काही झाले ते विसर. लोक मला शिव्या देतात, अश्लिल बोलतात. मी खूप भोळी, देवावर श्रद्धा असलेली मुलगी आहे. मला खोटे बोलणे आवडत नाही. तुझ्या नादी लागून मी खोटे बोलले, असे राखीने या व्हिडिओत म्हटले आहे.या व्हिडिओनंतर युजर्सनी राखीला पुन्हा एकदा फैलावर घेतले आहे. हा सुद्धा राखीचा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचे युजर्सनी म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी राखीने दीपक कलालसोबत येत्या ३१ डिसेंबरला लॉस एंजिल्समध्ये लग्न करणार असल्याचे जाहिर केले होते. यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखी व दीपक एकमेकांना शिव्या देताना दिसले होते. राखीने दीपकला ‘पतीला’ म्हटले होते.  

टॅग्स :राखी सावंत