Join us

 मेरी जिंदगी खत्म! ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 15:14 IST

युजर्सनी राखीला अगदी वाईट पद्धतीने ट्रोल केले. या सगळ्या प्रकारानंतर राखी रडताना दिसली. होय, ती अगदी ढसाढसा रडली. 

ठळक मुद्देराखी सावंतने नुकतेच एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले.

सीक्रेट लग्नाच्या चर्चेदरम्यान राखी सावंतने ‘छप्पन छुरी’ हे तिचे नवे आयटम सॉन्ग लॉन्च केले. या लॉन्च इव्हेंटला राखी एकदम बोल्ड अंदाजात पोहोचली. राखीने जो ड्रेस कॅरी केला होता तो प्रचंड रिविलिंग होता. या ड्रेसमधील राखीचे फोटो समोर आलेत आणि राखी ट्रोल झाली. युजर्सनी राखीला अगदी वाईट पद्धतीने ट्रोल केले. या सगळ्या प्रकारानंतर राखी रडताना दिसली. होय, ती अगदी ढसाढसा रडली. 

राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात ती जोरजोरात रडताना दिसतेय. ज्या डिझाईनरने मला तो कॉस्च्युम दिला होता, तो इतका रिवीलिंग असेल, याचा मला अंदाज नव्हता. त्या ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा असतील, हे मला ठाऊक नव्हते. माझे शरीर यातून दिसेल, याचाही मला अंदाज नव्हता. मला असे काहीही करायचे नव्हते. आता लोक मला दोष देत आहेत. माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. मी खूप स्ट्राँग आहे. पण आता माझे आयुष्य संपले. मला माझी बॉडी दाखवण्यात काहीही इंटरेस्ट नाही. लोक मला समजून घेत नाहीत. आज मी खूप दु:खी आहे, असे ती या व्हिडीओत म्हणते आहे.

कालच दीपक कलाल याने राखी आपल्या मुलाची आई होणार असल्याचा दावा केला होता. ‘राखी मेरा बच्चा तेरे पेट में पल रहा है. वो अपने पापा की बेइज्जती का बदला जरूर लेगा,’ असे  दीपक कलाल म्हणाला होता.राखी सावंतने नुकतेच एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले. आधी तिने ही बातमी नाकारली. माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण  शेवटी लग्न मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली होती. 

टॅग्स :राखी सावंत