राजकुमार राव बेस्ट अॅक्टर ‘एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड'ने सन्मानित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 12:07 IST
आपल्या दमदार अॅक्टिंगमुळे सर्व ठिकाणी प्रशंसा मिळविणारा राजकुमार रावचे नशिब खूप जोरावर आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक चित्रपटांची ...
राजकुमार राव बेस्ट अॅक्टर ‘एशिया पॅसिफिक स्क्रीन अॅवॉर्ड'ने सन्मानित !
आपल्या दमदार अॅक्टिंगमुळे सर्व ठिकाणी प्रशंसा मिळविणारा राजकुमार रावचे नशिब खूप जोरावर आहे. एका पाठोपाठ एक असे अनेक चित्रपटांची लाइन त्याच्याजवळ लागली आहे. त्याचा नुकताच रिलीज झालेला ‘न्यूटन’ या चित्रपटाला भारताकडून आॅस्करलाही पाठविण्यात आला होता. नुकतेच त्याला बिसबेन आॅस्ट्रेलियामध्ये झालेल्या ‘एशिया पैसिफिक स्क्रीन अवार्ड्स’ मध्ये सर्वश्रेष्ठ अॅक्टरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यूटन या चित्रपटात राजकुमार रावने न्यूटनची भूमिका साकारली होती, जो नक्षलवादी भागात इलेक्शन ड्युटी करण्यास जातो. या चित्रपटात पंकज त्रिपाठीदेखील आहे.पुरस्कार मिळाल्यानंतर राजकुमारने हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित करताना सांगितले की, ‘आम्ही सर्वजण चांगले काम करीत आहोत आणि अशाच चांगल्या कथांची निर्मिती व्हायला हवी. हा पुरस्कार सिनेमाच्या नावे आहे.’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता राजकुमारने नूतन कुमार उर्फ न्यूटनची भूमिका साकारली आहे. न्यूटन नवीन मात्र एक प्रामाणिक सरकारी क्लर्क आहे, ज्याची भारतातील छत्तीसगढ़ राज्याच्या संकटग्रस्त नक्षलवादी डोंगराळ भागात इलेक्शन ड्यूटी लावली जाते. विशेष म्हणजे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१७ मध्ये करण्यात आला होता. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी असल्याचे सांगण्यात आले होते. पुरस्कार मिळाल्यानंतर राजकुमारने आपल्या ट्रॉफीला चुंबन घेऊन एक फोटो ट्विटरवर शेअर केला. राजकुमारच्या सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कारा व्यतिरिक्त ‘न्यूटन’ला सर्वश्रेष्ठ स्क्रीनप्लेचाही पुरस्कार मिळाला आहे. या यशासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधीत बऱ्याच दिग्गजांनी राजकुमार आणि न्यूटनच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. हंसल मेहतानेही राजकुमारवर शुभेच्छांचा वर्षाव केला. Also Read : राजकुमार रावच्या ‘न्यूटन’चा वर्ल्ड प्रीमिअर होणार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये }}}}