Join us

राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीला ‘या’ निक नेमने बोलावितो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 21:42 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काहीकाळापासून मोठ्या पडद्यावर न झळकता छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवित आहे. सध्या ती ‘सुपर डान्सर ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काहीकाळापासून मोठ्या पडद्यावर न झळकता छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवित आहे. सध्या ती ‘सुपर डान्सर चॅप्टर-२’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत डान्स कोरिओग्राफर गीता आणि दिग्दर्शक अनुराग बासू हेदेखील परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. गेल्या एका एपिसोडमध्ये कंटेस्टेंटच्या परफॉर्मन्सदरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्याशी संबंधित एक खुलासा केला. यामध्ये तिने पती राज कुंद्रा तिला कोणत्या निक नेमने बोलावितो याचा उलगडा केला. शिल्पाने सांगितले की, राज मला बीबीसी नावाने बोलावितो. शिल्पाचे हे नवे निक नेम ऐकून गीता आणि अनुराग यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला. या एपिसोडमध्ये स्पर्धक आकाश थापा आणि विवेकने ‘कल हो ना हो’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला. या परफॉर्मन्सदरम्यान दोन लोकांमध्ये वाढत्या टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा वाढता ट्रेंड दाखविण्याचा प्रयत्न केला. हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर शिल्पाने याबाबतचा खुलासा केला की, पती राज मला ‘बीबीसी’ नावाने बोलावितो. असे बोलाविण्यामागचे कारण म्हणजे राजला असे वाटते की, शिल्पा टेक्नॉलॉजीविषयी खूपच बॅकवर्ड आहे. याबाबतचा उल्लेख करताना शिल्पाने म्हटले की, मला नेहमीच असे वाटते की, टेक्नॉलॉजीचा मी योग्यरीत्या वापर करू शकत नाही. त्यामुळेच ते मला ‘बीबीसी’ नावाने बोलावितात.  वास्तविक शिल्पा सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करीत असते. परंतु अशातही राज कुंद्राला ती याबाबतीत खूपच मागे असल्याचे वाटते. शिल्पाने सांगितले की, राज मला चिडविण्यासाठीच ‘बीबीसी’ नावाने बोलावितो. याचा अर्थ ‘बॉर्न बिफोर कॉम्प्युटर’ असा आहे. असो, शिल्पा या शोमध्ये नेहमीच तिच्या लूक आणि फिगरवरून चर्चेत असते.