Join us  

Raj Kundra: आता ईडीही खोलणार कुंद्राचे पोर्न‘राज’; हॉटशॉटसाठी 'ॲपल'कडून तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 8:39 AM

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

ठळक मुद्देपोर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर आता ईडीने मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा FIR मागवलाकुंद्रा याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे खाते गोठविण्यात आले आहे, तसेच गुगलवरील व्यवहाराची माहिती येणे बाकी

मुंबई : बहुचर्चित अश्लील चित्रपट रॅकेटच्या तपासात आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि परदेशात रक्कम वळविण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याचा छडा लावण्याचे ईडीने ठरविले आहे. त्यासाठी मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेकडे प्राथमिक अहवाल मागविला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष तपास सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर आता ईडीने मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा एफआयआर  आणि प्राथमिक तपासाचा अहवाल मागविला आहे. त्यानंतर मनी लॉड्रिंगअंर्तगत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. ईडी सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्राला फेमाअंतर्गत नोटीस समन्स बजावले जाणार आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांचीदेखील चौकशी होऊ शकते. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पला मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कुंद्राकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे. क्राइम ब्रँचने कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. कुंद्राच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात ५१ अश्लील व्हिडिओ जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.   

हॉटशॉटसाठी ॲपलकडून १,१३,६४,८८६ रुपये हॉटशॉटसाठी ॲपलकडून १ कोटी १३ लाख ६४ हजार ८८६ रुपये मिळाले होते. त्यानुसार, हे पैसे कुंद्राच्या कोटक महिंद्रा बँकेत जमा झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे खाते गोठविण्यात आले आहे, तसेच गुगलवरील व्यवहाराची माहिती येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.  

तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिटरकुंद्रा याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याबाबत फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्यात आला आहे. फॉरेन्सिक ऑडिटरसमोर आरोपीची चौकशी करायची असल्याचे सांगत, कुंद्राच्या कोठडीत आणखी ७ दिवसांची वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. त्याने डिलिट केलेला तपशीलही मिळविण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.  मात्र, न्यायालयाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी फेटाळली.  

कुंद्राला तातडीने दिलासा नाहीच राज कुंद्रा याला तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.  कुंद्राने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले.     

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीअंमलबजावणी संचालनालयमुंबई पोलीस