Join us  

‘रईस’ शाहरुखचा न्यू ईअर संदेश : मजनू बनके लैला के साथ खूब नाचो... लेकिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 3:52 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रईस’ची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त असलेल्या शाहरुख खानने ...

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रईस’ची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त असलेल्या शाहरुख खानने रईस लूकमध्ये आपल्या चाहत्यांना नव्या वर्षांच्या शुभेच्छा देताना एक संदेश दिला आहे. शाहरुख खाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ अपलोड करीत आपल्या चाहत्यांना नव्या वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख या व्हिडीओमध्ये रईसच्या लूकमध्ये दिसतोय. विशेष म्हणजे या लूक शिवाय व्हिडीओमधील बॅक ग्राउंड म्युझिक व सेट देखील रईसचा असल्याचे जाणविते. रईससाठी शाहरुखने आपल्या आवाजात थोेडा बदल केला आहे याची जाणीव हा व्हिडीओ पाहिल्यावर होते.हूूू.... पार्टी का माहोल... खूब पार्टी करो... मजनू बनके लैला के साथ नाचो....लेकिन शराब पी के गाडी मत चालावो... असे आवाहन त्याने या व्हिडीओमधून केले आहे. ‘रईस’ हा चित्रपट गुजरात मधील एका अवैध दारूच्या व्यवसायिकावर आधारित आहे. या व्यवसायिकाचा राजकारणावर मोठा पडगा असून त्याचे हे वर्चस्व नष्ट करण्याची हिमंत एक पोलीस अधिकारी दाखवितो अशी या चित्रपटाची कथा आहे. यामुळेच शाहरुखने दारू न पिण्याचे आवाहन केले असावे असा अंदाज लावला जात आहे. या सोबतच त्याने ‘मजनू बनके लैला के साथ नाचो’ या वाक्यातून अनेक खुलासे करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रईस’ या चित्रपटात सनी लिओन हिने ‘लैला मै लैला’ या गाण्यावर आयटम नंबर सादर केला असून सध्या या डान्सची चांगलीच चर्चा सुरू आहे. यूट्युबवर सनी लिओनचे हे गाणे चांगलेच हिट ठरले आहे. ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारीला हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटासोबत रिलीज होणार आहे.}}}}