Ragini Mms Returns Poster : करिश्मा शर्माच्या टॉपलेस लूकने उडवली अनेकांची झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:47 IST
अनेक ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये सध्या सोशल मीडियावर आणखी एक गोष्ट बरीच चर्चेत आहे. होय, ही गोष्ट म्हणजे एएलटी बालाजीची आगामी ...
Ragini Mms Returns Poster : करिश्मा शर्माच्या टॉपलेस लूकने उडवली अनेकांची झोप!
अनेक ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये सध्या सोशल मीडियावर आणखी एक गोष्ट बरीच चर्चेत आहे. होय, ही गोष्ट म्हणजे एएलटी बालाजीची आगामी वेबसीरिज ‘रागिनी एमएमएस202’. काही दिवसांपूर्वी या वेबसीरिजचे फर्स्ट लूक जारी झाले होते. आता या वेबसीरिजचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे.हे पोस्टर पाहून तुम्हाला एका गोष्टीची निश्चितपणे खात्री पटेल. ती म्हणजे, ही वेबसीरिज हॉरर आणि बोल्डनेसचे दमदार कॉम्बिनेशन असणार आहे. पोस्टममध्ये करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता यांची बोल्ड केमिस्ट्री या वेबसीरिजबद्दल बरेच काही सांगणारे आहे. हे पोस्टर कमालीचे बोल्ड आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जारी झालेल्या आत्तापर्यंतच्या पोस्टरपैकी सर्वाधिक बोल्ड पोस्टर असे या पोस्टरबद्दल म्हटले गेलेय. आता सुरुवात इतकी बोल्ड आहे तर अख्खी वेबसीरिज किती बोल्ड असेल, याची कल्पना आपण सहज करू शकू. सिद्धार्थ व करिश्मा या पोस्टरमध्ये एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून बघताहेत. त्यांच्यावर लाल साडीत एक चेहरा दिसतोय. हा चेहरा स्पष्ट दिसत नाही. या पोस्टरमध्ये करिश्मा टॉपलेस दिसतेय. या वेबसीरिजमध्ये करिश्मा मुख्य भूमिकेत आहे. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘ये है मोहब्बते’ सारख्या मालिकेत करिश्मा दिसलेली आहे. एकता कपूरने प्रोड्यूस केलेल्या या वेबसीरिजमध्ये रिया सेन ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यात ती सिमरन नावाची व्यक्तिरेखा साकारतांना दिसणार आहे. ALSO READ : WHAT ?? रिया सेनने चक्क खेचली सहअभिनेत्याची पॅन्ट !!ही वेबसीरिजची कथा दोन मुलींची कथां आहे. या दोन्ही मुली आपल्या कॉलेजात काही असामान्य घटनांच्या साक्षीदार बनतात आणि मग दोघीही ही रहस्ये शोधण्यासाठी एका एमएमएसची सीडी शोधू लागतात. यादरम्यान काय काय घटना घडतात, त्याचीच ही कथा आहे.