Join us  

 ‘तू सुंदर नाहीस’ म्हणत अनेक निर्मात्यांनी या अभिनेत्रीला दिला होता नकार, आज आहे स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 8:00 AM

लूक्समुळे नाकारण्यात आलेल्या या अभिनेत्रीला पुढे पहिला सिनेमा मिळाला आणि या चित्रपटातील तिच्या अ‍ॅक्टिंगने सगळ्यांची मने जिंकलीत. अर्थात यानंतरही तिचा संघर्ष संपला नाही.

ठळक मुद्देराधिकाने टीव्हीपासून सुरुवात केली. ‘मेरी आशिकी...तुम्ही से ही’ या मालिकेत ती झळकली आणि पुढे बॉलिवूडमध्ये आली.

‘हिंदी मीडियम’च्या यशानंतर या चित्रपटाचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कॅन्सरशी झुंज देणा-या इरफानचा हा कमबॅक सिनेमा असल्याने साहजिकच चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याच चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका साकारणा-या राधिका मदानची ही कहाणी. होय, विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटातून डेब्यू करणारी तीच ती राधिका मदान.

याच राधिकाला कधी काळी चेहरा सुंदर नाही म्हणून अनेकांनी नकार दिला होता. निर्मात्यांना राधिकाच्या अभिनयाबद्दल काहीही तक्रार नव्हती. पण तिच्या चेह-यावरून तिला बरेच काही ऐकवले गेले. तू सुंदर नाहीस, असे म्हणत अनेक निर्मात्यांनी तिला सुरूवातीच्या काळात चित्रपटास घेण्यास नकार दिला होता.

लूक्समुळे नाकारण्यात आलेल्या राधिकाला पुढे ‘पटाखा’ हा पहिला सिनेमा मिळाला आणि या चित्रपटातील तिच्या अ‍ॅक्टिंगने सगळ्यांची मने जिंकलीत. अर्थात यानंतरही तिचा संघर्ष संपला नाही.

‘पटाखा’नंतर ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानचा सिनेमा मिळणे, ही राधिकासाठी एक मोठी संधी होती. पण हा चित्रपट मिळवण्यासाठी राधिकाला ब-याच दिव्यातून जावे लागले. होय, त्याचे असे होते की, ‘अंग्रेजी मीडियम’ राधिकाने साकारलेली भूमिका निर्माता-दिग्दर्शक एका स्टार किडला देऊ इच्छित होते. (या चित्रपटासाठी सारा अली खानचे नाव चर्चेत होते.) राधिकाला ही भूमिका तिच्या हातून जाऊ द्यायची नव्हती. तिने कसेबसे निर्मात्यांना राजी केले. अनेक आॅडिशन्स देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा कुठे निर्मात्यांनी हा रोल राधिकाला दिला. 

राधिकाने टीव्हीपासून सुरुवात केली. ‘मेरी आशिकी...तुम्ही से ही’ या मालिकेत ती झळकली आणि पुढे बॉलिवूडमध्ये आली.

 

टॅग्स :राधिका मदन