Join us

राधिका आपटे पुन्हा झाली ट्रोल; विचारला जातायेत उलटे- सुलटे प्रश्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 16:17 IST

नुकतंच राधिकाने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यातच ती एका रेस्तराँमधील फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी मास्क न लावल्यामुळे तिला ट्रोल केले आहे.

अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. नुकतंच राधिकाने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यातच ती एका रेस्तराँमधील फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी मास्क न लावल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालनही करताना दिसत नाही. त्यामुळे राधिकाला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

राधिका सध्या पतीसह लंडनमध्ये आहे.लॉकडाऊन जाहीर झाला होता. तेव्हाच ती भारतातून लंडनला रवाना झाली होती. तेव्हापासून ती तिथेच आहे. अभिनेत्री राधिका आपटे ही नुकतीच एका हॉस्पिटलमध्ये स्पॉट झाली. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाली की काय, अशी चिंता तिचे चाहते व्यक्त करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो यात किती तथ्य आहे. अभिनेत्री राधिका आपटे शूटिंग रद्द झाल्यामुळे लंडनला गेली आहे. तिथे तिचा नवरा राहतो. त्यामुळे ती शूटिंग रद्द झाल्यामुळे लंडनला गेली आहे. ही माहिती तिनेच दिली होती.

त्यानंतर आता तिने इंस्टाग्रामवर एका हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. या फोटोत तिने चेहऱ्यावर मास्कही लावलेला दिसतो आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की, काळजी करण्याचे काहीच कारण नाही. सगळं काही नीट असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :राधिका आपटे