‘दंगल’ साठी आमीर बनणार ‘रॅपर’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:30 IST
बॉलीवूड अभिनेता आमीर खान हा आता काहीतरी हटके करण्याच्या विचारात आहे. आत्तापर्यंत कुठल्याच खान ने केले नाही असे तो ...
‘दंगल’ साठी आमीर बनणार ‘रॅपर’ ?
बॉलीवूड अभिनेता आमीर खान हा आता काहीतरी हटके करण्याच्या विचारात आहे. आत्तापर्यंत कुठल्याच खान ने केले नाही असे तो आता ‘दंगल’ साठी करणार आहे. ‘दंगल’ साठी आता तो ‘रॅपर’ बनणार आहे. ‘गुलाम’ चित्रपटामध्ये ‘आती क्या खंडाला?’ हे गाणे होते.तेच गाणे आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रॅपच्या स्वरूपात बनवण्यात येईल. व्हिडिओ शूट करण्याअगोदर तो गाणे रेकॉर्ड करणार आहे. हे गाणे प्रितमनी संगीतबद्ध केले असून अमिताभ भटटाचार्य यांनी हे गाणे लिहिलेले आहे. सध्या मि.परफेक्शनिस्ट गाण्यावर काम करतोय.